शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर विक्रेत्यांचे ‘उल्लू बनाविंग’

By admin | Updated: May 21, 2014 01:09 IST

एमआरपी, एक्स्पायरी व मॅन्युफॅक्चरिंग डेट नसलेल्या नामांकित कंपनीच्या आइस्क्रीमची विक्री

अकोला: खुल्या स्वरूपात विकण्याची परवानगी नसलेले एका नामांकित कंपनीचे आईस्क्रीम कप, दामदुप्पट दरात माथी मारून, अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांना उल्लू बनविल्या जात असल्याचे, ह्यलोकमतह्णने केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमुळे मंगळवारी उघडकीस आले. विशेष म्हणजे या आईस्क्रीम कपवर कमाल किरकोळ विक्री किंमत (एमआरपी), कालबाह्य तारीख (एक्सपायरी डेट) व उत्पादन तारीख (मॅन्युफॅक्चरिंग डेट)चा उल्लेख नाही. त्यामुळे सदर कपमधील आईस्क्रीम केव्हा तयार झाले होते, हे कळण्याचा काहीही मार्ग उपलब्ध नाही. ह्यअमूलह्ण या नामांकित कंपनीने, विवाहादी समारंभप्रसंगी किंवा मोठय़ा हॉटेल्समधील ग्राहकांसाठी प्रत्येकी १00 ग्रॅम वजनाचे २४ आईस्क्रीम कप असलेली खोकी बाजारात आणली आहेत. सदर खोक्यांमधील आईस्क्रीमच्या कपवर एमआरपी, तसेच एक्सपायरी व मॅन्युफॅक्चरिंग डेटचा उल्लेख नाही आणि सदर कप खुल्या स्वरूपात विकू नयेत, अशी स्पष्ट ताकीद प्रत्येक खोक्यावर, तसेच प्रत्येक आईस्क्रीम कपवर नमूद आहे. असे असतानाही अकोला रेल्वे स्थानकावर उष्णतेने त्रस्त झालेल्या प्रवाशांना दामदुप्पट दराने हे आईस्क्रीम कप विकल्या जात आहेत. कुठल्याही नामांकित कंपनीचा १00 ग्रॅम आईस्क्रीमचा कप रेल्वे स्थानकाबाहेर केवळ १0 रुपयांना विकत मिळतो; मात्र ह्यअमूलह्ण कंपनीचा ह्यइंडिव्हिजुअल कप नॉट टू बी सोल्ड लूजह्ण अशी स्पष्ट ताकीद नमूद केलेला १00 ग्रॅम आईस्क्रीमचा कप, रेल्वे स्थानकावरील फलाटांवर प्रवाशांना चक्क २0 रुपयांमध्ये विकल्या जात आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून, त्यामुळेच रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या डोळय़ादेखत ग्राहकांना उल्लू बनविण्याचा हा प्रकार सुरू आहे.