शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नि:स्वार्थी समाजसेवक, खासदार हरपला! चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत एकही गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 06:30 IST

मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती.

विशेष प्रतिनिधीपालघर : मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती. एकूण १४ लाखांच्या मालमत्तेतून २ लाखांचे कर्ज वजा केले तर कशीबशी १२ लाखांची मालमत्ता त्यांची आहे. लोकप्रतिनिधींचे पी.अ‍े. आणि साधे नगरसेवक करोडपती होण्याच्या काळात तीनदा खासदार व एकदा आमदार झालेल्या वनगांची ही आर्थिकस्थिती त्यांच्या नि:स्वार्थतेचे द्योतक आहे. पक्ष आणि समाज कार्यासाठी त्यांनी २००४ साली घेतलेली इंडिका कार ही एकमेव मोठी अशी मालमत्ता त्यांच्याकडे होती. परंतु ती इतकी जुनी होती की, तिचे काही मूल्येही उरलेले नाही.आपल्या खासदारकीच्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी भरलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रानुसार त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्टÑच्या तलासरी शाखेचे ६२३३२ रुपयांचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या तलासरी शाखेचे १२२३३२ असे एकूण १८४६६४ रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमीनीची किंमत ६ लाख होती. तर अकृषिक जमीनीची किंमत ३ लाख होती. पत्नीचे २ तोळ्याचे मंगळसूत्र हा एकमेव दागिना त्यांच्याकडे होता. त्याची किंमती ३० हजार रुपये होती. चार बँक खात्यातील शिल्लक अवघी ३२ हजार, राहते घर व गुंतवणूक हिशेबात घेतली तर त्यांची एकूण मालमत्ता १४ लाखांची त्यातून जर कर्जाची रक्कम वजा केली तर ती १२१५३३६ एवढीच होती. आजी-माजी मंत्री, पंतप्रधान, खासदार, आमदार हे शासकीय निवासस्थानाचे लाखो रुपयांचे भाडे व त्यातील सुविधांचे बिल थकविण्यात धन्यता मानत असतांना वनगा यांनी मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेचा एक छदामही बाकी ठेवलेला नव्हता. त्यामुळेच त्यांना नि:स्वार्थी व प्रामाणिक लोकप्रतिनीधी असे संबोधले जात होते.२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी २२३२३४ मते मिळवून व १२,३५९ मतांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत काँग्रेसच्या दामू शिंगडा यांनी १६०५७० आणि मार्क्सवादी पक्षाचे लहानू कोम यांनी ९२२२४ मते मिळविली होती. त्यामुळे वनगा यांचा पराभव घडून आला होता. या पराभवाने खचून न जाता वनगा यांनी पक्ष बांधणी आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलने उभारणे सुरु ठेवले. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी ५३३२०१ एवढी विक्रमी मते व २३९५२० मताधिक्यांनी बळीराम जाधव यांचा पराभव केला. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत वनगा यांनी भाजपचे उमेदवार म्हणून विक्रमगड मतदारसंघातून ४७३७१ मते मिळवून त्यांनी राष्टÑवादीचे चंद्रकांत भुसारा यांचा ५०३२ मताधिक्याने पराभव केला होता.लोकसभेत चिंतामणी या टोपण नावाने ते ओळखले जायचे. पेशाने वकील असलेल्या वनगा यांनी आपल्या वकीलीकडे कधी व्यवसाय म्हणून न पाहता वकीली हे जनसेवेचे साधन म्हणून वापरले. असंख्य गोर-गरीब जनतेचे खटले त्यांनी मोफत चालविले.आज बंदचे आवाहनडहाणू : खा.चिंतामण वनगा यांच्या निधनाचे वृत्त पसरताच संपूर्ण पालघर जिल्हयात शोककळा पसरली आहे.तर संघर्षातुन साकारलेले नेतृत्व हरपल्याची प्रतिक्र ीया सर्वत्र उमटली. तलासरी बरोबरच डहाणू, पालघर, विक्रमगड, जव्हार या तालुक्यात शोक व्यक्त केला जात होता.शेतीमध्ये राबणारे , भ्रष्टाचारमुक्त नेते म्हणून त्यांची ख्याती होती. पाकिस्तानच्या तुरुंगातील आदिवासी खलाशांची त्यांनी मुक्तता घडवून आणली होती. दुखवटा म्हणून डहाणू, चारोटी, कासा येथे बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन भाजपने केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारChintaman Wangaचिंतामण वनगा