शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बुडवण्यासाठी स्वत:चेच अपहरण

By admin | Updated: October 6, 2014 04:52 IST

शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने एका बारा वर्षीय मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणला आहे

ठाणे : शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने एका बारा वर्षीय मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणला आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे दुकानात केलेल्या चोरीची माहिती पालकांना मिळेल, या भीतीने आठ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला होता.कळव्यात चौथीत शिकणाऱ्या या मुलाला शाळेत जाण्याचा कंटाळा येत होता. त्यामुळे त्याने २४ सप्टेंबरला घरातून पळ काढला. याप्रकरणी २६ सप्टेंबरला कळवा पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास सुरू केला. याचदरम्यान तो गावी असल्याचा फोन त्याच्या पालकांना आला. ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटद्वारे त्याचे समुपदेशन केले असता त्याला शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने त्याने हा अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला.‘२४ सप्टेंबरला मला चौघांनी पळवून नेले. तेथे २०-२५ मुले होती. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी सोडले,’ असे त्याने सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेतला. पण, ते काही सापडले नाहीत. त्याने एकट्याने उत्तर प्रदेश गाठले. याचदरम्यान, त्याने रेल्वेत भीक मागून पोट भरले़ नंतर गाव गाठल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक कमालउद्दीन शेख, पोलीस नाईक अजय फराते यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)