शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता, ज्ञान, योग्यतेवर क्षेत्र निवडा

By admin | Updated: July 1, 2014 00:59 IST

दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते.

‘दहावीनंतर पुढे काय ?’मध्ये वक्त्यांचा सूर : विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते. विशेष म्हणजे, कोणतेही क्षेत्र निवडल्यानंतर त्यातील ज्ञान अपडेट ठेवणे आवश्यक असते, असा सूर वक्त्यांचा होता. ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्यावतीने ‘दहावी नंतर पुढे काय ?’ या शिर्षकांतर्गत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आज रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, जे.डी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे उपप्राचार्य श्रीकांत विजयराव सोनेकर, फ्युचर व्हिस्टाचे संचालक नितीन आचार्य, प्रेमलता डागा आणि निधी नशिने आदी उपस्थित होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात आयोजित या कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर ‘स्कोप’इंजिनिअरिंग अभ्यासक्र मांच्या प्रवेश प्रक्रि येत नेमक्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, आरक्षणाचे नियम , जागांचं वाटप कसं असतं, आॅप्शन फॉर्म भरताना घ्यायची काळजी अशा अनेक बाबींविषयी असलेल्या शंकांचं निरसन श्रीकांत सोनेकर यांनी केले. ते म्हणाले, इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर स्कोप आहे. साधारण २०-२५ व्या वर्षी अर्निंग सोर्स सुरू करता येतो. इंजिनिअरिंगनंतर रिसर्च फिल्ड, फार्मा, बायोमेडिकल, इन्श्युरन्स या शिवाय गव्हर्नमेंट सेक्टर मध्येही जाता येऊ शकते. कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात साधारण ६-७ वर्षे जातात परंतु इंजिनिअरिंगमध्ये चारच वर्षे लागतात. यात शेवटच्या वर्षाला जॉब मिळविता येतो. एका निरीक्षणात असे आढळून आले आहे, २०१६ मध्ये भारतात ३ मिलेनियम इंजिनिअरिंगच्या पोस्ट निर्माण होणार आहेत. लक्ष्य निश्चित कराआयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, हा कानमंत्र नितीन आचार्य यांनी दिला. ते म्हणाले, इंजिनिअरिंगच्या फक्त १० हजार जागा आहेत. यामुळे जेईईई मेन्स आणि बारावी बोर्डवर आपले लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर आयआयटीची तयारी करावी. यावेळी आचार्य यांनी फ्युचर व्हिस्टातील कोचिंग क्लासेसचीही माहिती दिली. (प्रतिनिधी)