शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मोरानी, शाहरूख यांची सुरक्षा वाढवली

By admin | Updated: August 27, 2014 14:09 IST

अंडरवर्ल्डकडून झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी निर्माते अली मोरानी आणि अभिनेता शाहरूख खान या दोघांच्या सुरक्षेत वाढ केली आ

मुंबई : अंडरवर्ल्डकडून झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी निर्माते अली मोरानी आणि अभिनेता शाहरूख खान या दोघांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. २३ आॅगस्टला मोरानी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाला होता. याआधी मोरानी यांना गँगस्टर रवी पुजारीने खंडणीसाठी धमक्या आल्या होत्या. त्यामुळे हा गोळीबारही पुजारी टोळीनेच केल्याचा संशय पोलिसांना आहे. सकाळपासून मोरानी यांच्यानंतर पुजारीने शाहरूखलाही धमकावल्याची चर्चा होती. मात्र मुंबई पोलिसांनी ती फेटाळून लावली. शाहरूख यांच्याकडून धमक्यांची तक्रार आलेली नाही, तसेच सुरक्षा वाढविण्याबाबतही अर्ज आलेला नाही, असे सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी सांगितले. मोरानी यांची सुरक्षा वाढविल्याचे मात्र त्यांनी स्पष्ट केले. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार शाहरूखला पुरविलेली सुरक्षा खबरदारीचा उपाय आहे.गँगस्टरची पंचाईतगँगस्टर पुजारीने मोरानींच्या घरावर गोळीबार केला खरा मात्र मुंबई पोलिसांनी या गुन्हयाला फारशी प्रसिद्धी न दिल्याने त्याची पंचाईत झाली. अखेर गोळीबाराच्या दोन दिवसांनंतर होय मीच गोळीबार केला, अशी माहिती खुदद गँगस्टरनेच मुंबईत पसरवल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)