शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी यांचा ‘सिक्रेट’ दौरा

By admin | Updated: September 19, 2014 00:59 IST

बिबट्यांच्या शिकारी प्रकरणाने वन विभाग चांगलाच हादरला आहे. भिवापूर येथे गत आठ दिवसांत दोन बिबट्यांचे चामडे वन विभागाच्या हाती लागले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट

बिबट्याचे शिकार प्रकरण : वन विभाग हादरला नागपूर : बिबट्यांच्या शिकारी प्रकरणाने वन विभाग चांगलाच हादरला आहे. भिवापूर येथे गत आठ दिवसांत दोन बिबट्यांचे चामडे वन विभागाच्या हाती लागले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. यामुळे अख्खा वन विभाग अस्वस्थ झाला असून, गुरुवारी स्वत: वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी सकाळी १० वाजताच्या सुमारास उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा ‘सिक्रेट’ दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पोकीम व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी होते. प्रधान सचिवांनी सर्वप्रथम नवेगाव येथील रेस्टहाऊसवर भेट देऊन, त्यानंतर पवनी वन परिक्षेत्रात दौरा केल्याची माहिती आहे. वन विभागाच्या विशेष पथकाने गत १२ सप्टेंबर रोजी भिवापूर येथे रणजितसिंग जुनी या आरोपीला बिबट्याच्या चामड्यासह रंगेहात अटक केली. मात्र त्याच वेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे हा घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला होता. यानंतर चार दिवसात पुन्हा येथील एका शेतातील झुडपात दुसऱ्या एका बिबट्याचे चामडे सापडले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणातील दोन्ही आरोपी सराईत शिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांनी या दोन बिबट्यांसह पुन्हा काही वाघ व बिबट्यांचा बळी घेतला का? अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. यातील मुख्य आरोपी श्रावणच्या घरापासून काहीच अंतरावर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य असून, येथे वाघ व बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. (प्रतिनिधी)मुख्य आरोपी मोकाटचमाहिती सूत्रानुसार बिबट्याच्या शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे हा खुलेआम मोकाट फिरत आहे. तो रोज घरी जेवण करायला येत असून, यानंतर पुन्हा फरार होत असल्याची माहिती आहे. त्यानुसार बुधवारीसुद्धा तो घरी आला होता. तसेच गुरुवारी सायंकाळीसुद्धा तो जेवण करून गेला. विशेष म्हणजे, त्याच्या या हालचालींची वन विभागाला वेळोवेळी माहिती मिळत असून, त्याची स्वत: एका वनाधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी आरएफओ बेलेकर यांना माहिती दिल्याचे सांगितले जाते. परंतु असे असताना आरोपी श्रावण याला अटक का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.