शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तचा दुसरा टप्पा धीम्या गतीने

By admin | Updated: May 19, 2016 06:08 IST

जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यातील ४७० कामे प्रगतीपथावर आहेत.

राजेश खराडे,

बीड- जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यातील ४७० कामे प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामे पावसाळ््यापूर्वी त्वरित सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र बीडमध्ये १७ व आष्टी तालुक्यात २० कामे वगळता इतर तालुक्यांमध्ये अजून कामांचा श्रीगणेशाही झालेला नाही.सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याकरीता मराठवाड्यात सर्वाधिक २४२ गावांची निवड बीड जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. याविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामांचा आढावा घेऊन कामे त्वरीत सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बीड तालुका कृषी विभागाच्या वतीने १७ कामांच्या निविदा काढून कार्यरंभाचे आदेश देण्यात आले आहेत. वस्तुत: मार्च अखेरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही प्रक्रियेतच कामे अडकली आहेत. गावांची नावे जाहीर होताच त्याची पाहणी करून आवश्यक असणाऱ्या कामांच्या याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असतानाही कामांना गती मिळालेली नाही.निविदा प्रक्रियामुळे खोडापहिल्या टप्प्यातील कामे कृषी विभागाअंतर्गत होती. त्यामुळे कामांत अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. दुसरा टप्पा हा निविदेनुसार होत असल्याने हा सहभाग कमी झाला आहे. अनेक तालुक्यांमधून कामांच्या याद्याही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे जमा नाहीत. त्यामुळे नेमकी काय कामे सुरू आहेत याबाबत वरिष्ठ अधिकारीही दुसऱ्या टप्प्याबाबत अनभिज्ञ आहेत. दुष्काळामुळे शेततळ्यांच्या कामांना ब्रेकजालना : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७०६ शेततळ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, तीव्र दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी या कामांना ब्रेक दिल्याचे चित्र आहे. तळ््यासाठी शासनाकडून ५० हजार रुपयांचे किरकोळ अनुदान मिळत आहे. यातून शेततळे तयार करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या योजनेअंतर्गत साडेपाच हजार अर्ज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. दुष्काळ व तसेच शेतकऱ्यांकडे पैशांची जुळवाजुळव नसल्याने मंजूर असलेले शेततळ्यांची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस पडल्यावरच शेतकरी शेततळी करतील, असा अंदाज कृषी अधिकारी व्यक्त करतात.