शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाचा दुसरा टप्पा टोल फ्री

By admin | Updated: July 1, 2015 02:04 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झाराप या टप्पा क्रमांक-२साठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून, या प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्र सरकार उभारणार आहे.

आविष्कार देसाई , अलिबागमुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झाराप या टप्पा क्रमांक-२साठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून, या प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्र सरकार उभारणार आहे. त्यामुळे या मार्गासाठी टोल द्यावा लागणार नसून, आॅक्टोबरमध्ये कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी येथे दिली. अलिबाग येथील दक्षता व संनियंत्रण समितीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.इंदापूर-झाराप या ३६६ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम केंद्र सरकार करणार असून, आॅक्टोबर महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी २ हजार ९०० कोटी रुपये खर्च येणार होता. त्यानंतर तो सुमारे ३ हजार ९०० कोटींवर पोहोचला. मात्र या मार्गावर सर्वांच्या सोयीसाठी एलिव्हेटेड रोड, काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याची प्रकल्प किंमत सुमारे ५ हजार कोटींपर्यंत जाऊ शकते असे, गीते यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाचा पहिला टप्पा पळस्पे- इंदापूर असा ८४ किलोमीटरचा आहे. सध्या ३० टक्के काम पूर्ण झाले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काम रखडण्याला जमीन संपादन, अतिक्रमणे अशी विविध कारणे आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे अकराशे कोटी रुपयांचा खर्च आहे. सध्या १४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. विविध बँकांनी ७५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, त्याचप्रमाणे उर्वरित ७० कोटी रुपये ठेकेदाराने उभे करायचे आहेत. ७० कोटी रुपये ठेकेदाराला उभे करता येत नसतील, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्या मंत्रालयामार्फत तो निधी उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. गडकरी यांनी मागील बैठकीत हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.