शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आसनव्यवस्थेचा तिढा कायम

By admin | Updated: April 7, 2017 00:44 IST

महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसनव्यवस्थेचा तिढा अजूनही कायम आहे

पुणे : महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसनव्यवस्थेचा तिढा अजूनही कायम आहे. वाद मिटला असल्याचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाने सुचवलेला तोडगा अमान्य असल्याची भूमिका घेतली आहे. सभागृहात भाजपाचे संख्याबळ ९८ आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी १०, मनसेचे २ व एमआयएमचा १ असे संख्याबळ आहे. सभागृहात एकूण ४ रांगा आहेत. त्यातील दोन्ही बाजूंच्या दोन रांगांत प्रत्येकी ५२ व मधल्या दोन रांगांत प्रत्येकी ३९ अशी आसने आहेत. सर्व रांगांमधील पहिल्या आसनांची एकत्रित संख्या १४ आहे. सभागृहाच्या उजव्या बाजूला सत्ताधारी व डाव्या बाजूला विरोधक, पहिल्या रांगेत सर्व पक्षांचे गटनेते व त्यांच्या मागे त्यांचे सदस्य अशी आसनव्यवस्था असते. सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या गटनेत्यांसाठी पहिल्या रांगेतील आसने व त्यांच्या मागे त्यांच्या पक्षाचे सदस्य अशी व्यवस्था हवी आहे. मात्र, सभागृहाच्या आसनरचनेमुळे ते शक्य नाही. भाजपाने सभागृहनेत्याबरोबरच उपमहापौर तसेच पक्षाचे ज्येष्ठ सदस्य यांच्यासाठी दोन रांगांमधील ७ जागा मागितल्या आहेत. राष्ट्रवादीलाही विरोधी पक्षनेते व त्यांच्या माजी महापौरांसाठी पहिल्या रांगेतीलच आसने हवी आहेत. शिवसेना, काँग्रेस व मनसेच्या गटनेत्यांनाही पहिल्या रांगेतीलच जागा हवी आहे. (प्रतिनिधी)सभागृहातील डावीकडच्या दोन रांगा तुम्ही घ्या, त्यानंतरची एक रांग काँग्रेस, सेना, मनसे यांची असेल व नंतरच्या रांगेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बसतील असा पर्याय आम्ही दिला आहे. त्यांना तो मान्य नाही, त्यामुळेच त्यांनी पहिल्या तीन रांगांमध्ये त्यांच्या सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या लावल्या आहेत. ही मनमानी झाली व आम्ही सभागृहातच त्यांना याचे उत्तर देऊ. - चेतन तुपे, विरोधी पक्षनेतेभाजपाची सदस्यसंख्या जास्त आहे. त्यामुळे आसनव्यवस्थेत काही बदल होणे स्वाभाविक आहे. त्यांना आम्ही निर्णय दिला आहे व तो समाधानकारक आहे. १९ एप्रिलला सभा होईल त्यामध्ये हा विषय मिटलेला, असेल अशी आशा आहे.- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते>माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखा...सध्या पदाधिकारी वगळता विरोधी व सत्ताधारी पक्षांचे नगरसेवक पाहिजे तसे बसत आहेत. सत्ताधारी भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले व विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सेनेचे संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे यांच्यात जागेसंबंधी आतापर्यंत तीन वेळा चर्चा झाली. मात्र, त्यात समाधानकारक तोडगा निघाली नाही. आमच्या माजी महापौर व पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे असा विरोधी पक्षांचा आग्रह आहे तर सत्ताधाऱ्यांना काही अधिकार देणार की नाही असा भिमाले यांचा सवाल आहे.