शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बाळाच्या आईचा शोध सुरू

By admin | Updated: April 29, 2016 06:11 IST

नांदेडहून १ लाख ८० हजार रुपयांना विकत घेतलेले मूल कुमारी मातेचे असून, ताडदेव पोलीस सध्या या मुलाच्या आईचा शोध घेत आहेत.

मुंबई : नांदेडहून १ लाख ८० हजार रुपयांना विकत घेतलेले मूल कुमारी मातेचे असून, ताडदेव पोलीस सध्या या मुलाच्या आईचा शोध घेत आहेत. मुलाच्या आईच्या चौकशीत यामागील सत्य समोर येणार असल्याचे ताडदेव पोलिसांचे म्हणणे आहे. दक्षिण मुंबईतील एका दाम्पत्याने नांदेडहून १.८० लाख रुपयांना मूल विकत आणल्याचा खुलासा पोलीस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्रातून झाला होता. पोलिसांच्या चौकशीत हे मूल एका कुमारीमातेचे असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आॅगस्ट २०१४मध्ये एका कुमारीमातेने हे मूल बालगृहात आणून दिले होते. त्याची रीतसर नोंदणीही करण्यात आल्याचे गुट्टे हिने चौकशीत पोलिसांना सांगितले आहे. बालगृहातील नोंदी पाहून या मुलाच्या मातेविषयी अधिक सांगता येईल, असेही या संचालिकेने चौकशीत सांगितले. दरम्यान, आपण दाम्पत्याला मूल दिल्यानंतर दत्तकप्रक्रिया नंतर करू या, असे सांगितले होते, परंतु ते परत आलेच नाहीत, असा दावाही आता संचालिका पोलिसांपुढे करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विकत आणलेल्या मुलाला संगोपनासाठी किंग्ज सर्कल येथील मानव सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेत ठेवले आहे. बाळाच्या आईचा शोध लागल्यास यामागील सत्य समोर येईल. तिने स्वखुशीने या बाळाला संस्थेकडे सोपविले होते का, की यामागे आणखी काही गूढ आहे याचा उलगडा यातून होणार असल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली. >दक्षिण मुंबईतील एका दाम्पत्याने नांदेडहून १.८० लाख रुपयांना मूल विकत आणल्याचा खुलासा पोलीस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्रातून झाला. ताडदेव पोलिसांनी या प्रकरणात मूल विकत घेणारे दाम्पत्य, त्यांना मदत करणारे दोन नातेवाईक आणि मूल विकणारी नांदेडच्या सुनीता बालगृहाची संचालिका सत्यश्री गुट्टे यांना अटक केली आहे.