शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीमुळे जयंतराव पर्यायांच्या शोधात

By admin | Updated: December 9, 2014 23:53 IST

वादळापूर्वीची शांतता : कार्यकर्त्यांत अस्वस्थता; अस्तित्व टिकविण्यासाठी जोरदार प्रयत्न

अशोक पाटील -इस्लामपूर -पंधरा वर्षांनंतर मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे वनजदार नेते आमदार जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. जयंतराव वरवर शांत दिसत असले तरी, अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी केल्याची चर्चा एकीकडे आहे, तर दुसरीकडे याच पक्षात राहून स्वत:च्या गटाची मजबूत बांधणी करण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे बोलले जात आहे.सध्या जयंत पाटील यांनी आफ्रिकेत भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्याने ते राजकीय कोंडीत सापडले आहेत. कारण जिल्हा बँकेतील गैरव्यवहारासारखे जिल्ह्यातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागले असून, त्या प्रश्नांवर विधानसभेत त्यांना सामोरे जावे लागणार आहे. पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात इस्लामपूर व परिसरात कार्यकर्त्यांना गारमेंट उद्योग उभे करण्यास पाठबळ दिले, परंतु हा उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या पेठनाक्यावरील खासगी प्रकल्पात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. तेथील कामगारांचे प्रश्न जटिल बनू लागले आहेत. तेथे मतदारसंघातील हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले होते, परंतु पगाराच्या प्रश्नावरून त्यातील अनेकांनी काम बंद केले आहे. परिणामी मजुरांची संख्या रोडावल्याने हा उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे.राजारामबापू उद्योग समूहातील राजारामबापू बँक, दूध संघ आणि शिक्षण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्था चालविण्यासाठी पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मंत्रीपद असताना त्यांनी या संस्थांसाठी विविध योजनांतून निधी मिळवला होता. आता मंत्रीपद नसल्याने संस्था चालविणे आव्हान ठरणार आहे. याच गोष्टींचा विचार केला तर आगामी काळात राजकीय धोरणांमध्ये त्यांनी आश्चर्यकारक बदल केले तर आश्चर्य वाटणार नाही. जयंत पाटील गेले काही दिवस परदेश दौऱ्यावर होते. सध्या ते हिवाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यानंतर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून संस्थात्मक बांधणीसह राष्ट्रवादीला भक्कम करणे अथवा इतर निर्णय घेणे याबद्दल बैठक निश्चित करण्यात आली आहे.- बी. के. पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.राजकीय भूकंप होण्याची चिन्हे...इस्लामपूर व आष्टा शहरांतील विकासाच्या योजना प्रलंबित आहेत. यासाठी विविध योजनांतून निधी मिळविण्यासाठी पाटील यांचे प्रयत्न राहतील, परंतु मंत्रीपद नसल्याने त्यात अडथळेही येणार आहेत. या संकटांना तोंड देण्यासाठी सध्या पाटील यांनी शांत राहणे पसंत केले आहे. मात्र पाटील यांची कारकीर्द पाहता, ही वादळापूर्वीची शांतता असून, भविष्यात राजकीय भूकंप करून धक्का देण्याची तयारी त्यांनी चालवली असल्याचे संकेत मिळत आहेत.