शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नंबरप्लेटच्या तुकड्यांवरून आरोपीचा शोध

By admin | Updated: February 18, 2015 01:13 IST

नेरूळमध्ये एका वृद्धाला धडक दिल्याप्रकरणी दोन महिन्यांच्या तपासानंतर एका महिला डॉक्टरला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

नवी मुंबई : नेरूळमध्ये एका वृद्धाला धडक दिल्याप्रकरणी दोन महिन्यांच्या तपासानंतर एका महिला डॉक्टरला अटक करण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळावर मिळालेल्या नंबरप्लेटच्या तुकड्यांच्या आधारे पोलिसांनी शिताफिने या अपघाताचा उलगडा केला आणि मंगळवारी डॉ. पद्मा प्रिया यांना सीवूडमधून अटक केली.नेरुळ येथील शिवाजी चौकात १७ डिसेंबर रोजी हा अपघात झालेला. नेरुळचे राहणारे एन. एम. मनी कंडक (५०) हे स्कुटीवरून (एमएच ४३-एम ७५२४) जात असताना त्यांना कारने धडक दिली. या अपघातात कंडक हे गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांना मदत न करता कारचालकाने कारसह तेथून पळ काढला होता. या अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी कंडक यांना रुग्णालयात वेळीच दाखल केल्याने ते बचावले. याप्रकरणी फरार कारचालकाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.पोलिसांना घटनास्थळी कारच्या नंबरप्लेटचे काही तुकडे आढळले होते. हे तुकडे एकत्र जोडून पोलिसांनी काही संशयित नंबरप्लेट तयार केल्या होत्या. त्याद्वारे अनेक वाहनांचा शोध घेऊन सखोल तपासाअंती फरार कारचालक महिलेला अटक केली. डॉ. पद्मा प्रिया असे या कारचालक महिलेचे नाव असून त्या नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयातील डेन्टीस्ट आहेत. जखमीला मदत करण्याऐवजी या महिला डॉक्टरने तेथून पळ काढला होता.(प्रतिनिधी)च्काळ्या रंगाची कार आणि नंबरप्लेटचे काही तुकडे केवळ एवढीच माहिती पोलिसांपुढे होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक मंगेश पालांडे, जगवेंद्रसिंग राजपूत व पोलीस उपनिरीक्षक पूनम बागल यांनी नंबरप्लेटचे तुकडे जोडून ‘एमएच ०२ पी ४३’ हा नंबर तयार केलेला. च्त्याआधारे मुंबई आरटीओकडे त्यांनी चौकशी केली असता ‘एमएच ०२ पी ४३११’ या संशयित कारचालकाचा बोरिवली येथील पत्ता पोलिसांना मिळाला. तेथे जाऊन चौकशी केली असता कारमालकांनी राहण्याचे ठिकाण बदलले असल्याचे समोर आले. अखेर त्याच परिसरात चौकशी करून त्यांचे सीवूड येथील राहण्याचे नवे ठिकाण पोलिसांनी शोधून काढले. त्यानुसार डॉ. पद्मा प्रिया यांना अटक केल्याचे संगीता शिंदे यांनी सांगितले.