शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तेल सर्वेक्षणाविरोधात समुद्रात निदर्शने

By admin | Updated: January 17, 2015 05:48 IST

ऐन मासेमारीच्या हंगामात ओएनजीसी (आॅइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) या तेल कंपनीद्वारे समुद्रात तेल सर्वेक्षण होत असल्याने त्याविरोधात

भार्इंदर : ऐन मासेमारीच्या हंगामात ओएनजीसी (आॅइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) या तेल कंपनीद्वारे समुद्रात तेल सर्वेक्षण होत असल्याने त्याविरोधात पश्चिम किनारपट्टीवरील मुंबईच्या कुलाबा ते पालघरसह सातपाटीपर्यंतच्या मच्छीमारांनी शुक्रवारी बोटींवर काळे झेंडे लावून भरसमुद्रात निदर्शने केली. ओएनजीसी तेल कंपनीमार्फत पश्चिम किनारपट्टीवरील वसई ते अर्नाळा समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ५० नॉटीकल मैल अंतरावर १५ जानेवारीपासून तेलसाठ्याचे सर्वेक्षण सुरू करण्याचे निश्चित केले होते. सुरुवातीला हे सर्वेक्षण ६ ते २१ जानेवारीदरम्यान करण्याचे ठरविले होते. परंतु, तांत्रिक कारणास्तव ते १५ जानेवारी रोजी सुरू करण्याचे ठरविल्यानंतर मच्छीमारांचा त्याला होणारा विरोध लक्षात घेऊन त्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे सर्वेक्षण साधारणत: ८ ते १० चौरस नॉटीकल मैल क्षेत्रातच होत असताना सर्वेक्षणादरम्यान मच्छीमारांना मासेमारीसह समुद्रात ये-जा करण्यास बंदी घालतली होती. ऐन मासेमारी हंगामात मासेमारीवर तेल सर्वेक्षणामुळे गंडांतर येणार असल्याने मच्छीमारांनी याला विरोध दर्शविला आहे. ते १५ मेनंतर मासेमारी बंदीच्या कालावधीत करण्याची मागणी मच्छीमारांनी केली असून तसे पत्रच शासनासह ओएनजीसीला दिले आहे़ परंतु, त्यावर निर्णय न झाल्याने कुलाबा ते सातपाटीदरम्यान हजारो मच्छीमारांनी शुक्रवारी बोटींना काळे झेंडे लावून ३० ते ३५ नॉटीकल मैल खोल समुद्रात जाऊन निषेध व्यक्त केला. यासाठी १९-२५ व ७२-१२ (जीपीएस पोझिशन सिस्टीम) पोझिशनच्या ठिकाणी मच्छीमार बोटी एकत्र आल्या. त्याचा आढावा घेण्यास सागरी पोलिसांनीही समुद्रात धाव घेतली होती. दरम्यान, सर्वेक्षण सुरू न झाल्याने मासेमारी सुरू असल्याचे पाली-उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)