शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’वर धनदांडग्यांचा डल्ला

By admin | Updated: July 1, 2016 01:58 IST

पगाराची नोकरी असलेल्या चतुर मंडळींनी कमी उत्पन्नाचा दाखला मिळवून पाल्याचा इंग्रजी शाळेतील प्रवेश आरटीईच्या माध्यमातून केला

पिंपरी : आलिशान मोटारी, सदनिका, गलेलठ्ठ पगाराची नोकरी असलेल्या चतुर मंडळींनी कमी उत्पन्नाचा दाखला मिळवून पाल्याचा इंग्रजी शाळेतील प्रवेश आरटीईच्या माध्यमातून केला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षणात धनदांडग्यांनी लाभ उठविल्याने खरे गरजू मात्र वंचित राहिले आहेत. मात्र, काही संस्थाचालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित पालकांच्या पाल्याचा प्रवेश रद्द करण्यात आलेला आहे. परंतु, यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण किंवा काम करणारी सर्वेक्षणात्मक समिती नाही. त्यामुळे ज्यांना प्रवेश मिळणे अत्यंत गरजे आहे, त्यांना न मिळता, इतरांनाच आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश मिळू लागला आहे. एका नामांकित शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून एका पालकाने खटाटोप करून उत्पन्नाचा दाखला मिळवला. प्रवेशासाठी शाळेकडे तो सादर केल्यास लक्षात आले की, शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती महिन्याला साठ हजार रुपये पगार मिळवूनही आरटीई प्रवेशाचा लाभ घेऊ इच्छित आहे. तेव्हा शिक्षण मंडळ प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर प्रवेश रद्द के ला आहे. आरटीईच्या माध्यमातून कित्येक पालकांचे अद्यापपर्यंत प्रवेश झालेले नाहीत. काही पालकांकडे कागदपत्रे अपूर्ण आहेत, तर काही गरजू पालक प्रवेश कसा घ्यायचा, या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ आहेत. खऱ्या अर्थाने गरजू आहेत, त्यांच्याऐवजी धनदांडगे लोकच आरटीईअंतर्गतच्या प्रवेशाचा लाभ उठवत आहेत, असा आरोप संस्थाचालक करू लागले आहेत. अल्प उत्पन्न दाखवून, तसेच नगरसेवक, आमदार, खासदार यांची शिफारसपत्रे जोडून प्रवेशासाठी आग्रह धरला जातो. सध्या आरटीईचे शैक्षणिक शुल्क शासनाने १७,३२९ रुपये देण्याचे मंजूर केले आहे. यापूर्वी ते १३,४७४ होते. सर्व शाळांना हे शुल्क परवडत नाही. त्यामध्ये वाढ झाली आहे. नेमके गरजू कोण? कोणाला आरटीईचा लाभ मिळणे आवश्यक आहे? हे तपासण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे आहे, असे संस्थाचालक, शाळा व्यवस्थापनाला वाटते. या माध्यमातून प्रवेश मिळविण्याचे गैरप्रकार वाढू लागले आहेत. (प्रतिनिधी)धनदांडग्या पालकांनी आरटीईतून प्रवेश मिळवून पैसे वाचविण्याचा वेगळा फंडा शोधला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशा प्रकारे प्रवेश मिळाल्यास खासगी शाळेच्या तुलनेत ४० ते ५० हजार रुपयांची बचत होते. शिवाय, सर्व साहित्यही मोफत मिळते. २५ टक्क्यांतील प्रवेशामध्ये धनदांडगेच अधिक लाभ उठवत आहेत. - राजेंद्र सिंग, इंडिपेंडंट स्कूल असोसिएशन प्रवेश घेण्यासाठी पालक चारचाकीतून येतात. हातात स्मार्ट फोन आणि अंगावर सोनं दिसून येते. त्यांच्याकडे पाहून वाटत नाही की, या पालकांना आरटीईतून प्रवेश मिळायला हवा. पालकांकडे चौकशी केली असता सांगतात की, आमचा प्रवेश घेण्याचा हक्क आहे. शाळेलाच उलटी उत्तरे दिली जातात. तक्रार करण्याची धमकी दिली जातात. अशा पालकांना बोलणेही अवघड आहे. - जागृती धर्माधिकारी, संस्थाचालक धनदांडग्या व्यक्ती जर आरटीईच्या माध्यमातून प्रवेश घेत असतील, तर पायबंद घालणे गरजेचे आहे. संबंधित संस्थाचालकांनी अशा बाबी निदर्शनास आणून द्याव्यात. अशा व्यक्तीची कागदपत्रे तपासणी केली जाईल. तसेच, त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे धोरण अवलंबावे लागणार आहे. - बी. सी. कारेकर, प्रशासन अधिकारी गरीब विद्यार्थी प्रवेशापासून वंचितकागदपत्रांची जमवाजमव करण्याचा खटाटोप करूनही आरटीई निकषात काही विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. अनेकांचे प्रवेश विविध कारणास्तव रद्द झाले आहेत. आरटीईच्या जागा रिक्त असूनही अनेक गरीब, गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. गोरगरिबांना आरटीई प्रवेशाचा लाभ मिळत नसल्याने पालकांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.