शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचे परीक्षार्थींच्या पायाला चटके; भार्इंदरच्या परीक्षा केंद्रात परीक्षार्थी अनवाणी

By admin | Updated: May 7, 2017 18:16 IST

परीक्षार्थ्यांना बुटासह सर्वप्रकाराच्या चप्पल घालून परीक्षेला बसण्यास मनाई केल्याने उन्हात परीक्षार्थ्यांच्या पायाला चटके बसल्याची चीड पालकांमधून व्यक्त होत होती.

राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 7 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) रविवारी देशव्यापी नीट (एनईईटी) या वैद्यकीय पूर्व परीक्षेचे आयोजन केले होते. त्यात परीक्षार्थ्यांना बुटाखेरीज चप्पलांसह परीक्षेला बसण्याची अट सीबीएसईने घातली असताना देखील मीरारोड येथील सेव्हन स्क्वेअर अ‍ॅकेडमी परीक्षा केंद्रात मात्र परीक्षार्थ्यांना बुटासह सर्वप्रकाराच्या चप्पल घालून परीक्षेला बसण्यास मनाई केल्याने उन्हात परीक्षार्थ्यांच्या पायाला चटके बसल्याची चीड पालकांमधून व्यक्त होत होती.ठाणे जिल्ह्यातील मीरा-भार्इंदर मधील सेव्हन स्क्वेअर अ‍ॅकेडमी या केंद्रात जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे 600 परीक्षार्थी आपल्या पालकांसह सकाळी 6 वाजल्यापासूनच हजर होत होते. उन्हाचा पारा चढताच पालकांनी परीक्षार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याची विनंती शाळेकडे केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला सुनावण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने परीक्षार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. यानंतर मुलांना उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध न करता त्यांना सुमारे तासभर उन्हातच उभे करण्यात आले. तसेच सीबीएसईच्या निर्देशानुसार परीक्षार्थ्यांना पायात बूट घालून तसेच इतर वर्जित साहित्यांसह परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु स्लिपर्स आणि कमी उंचीच्या सॅण्डल्स घालून परीक्षेला बसून देण्यास अनुमती देण्यात आली होती. शाळेने मात्र सर्वच परीक्षार्थ्यांना बुटासह सर्व प्रकारच्या चप्पला घालून परीक्षेला बसण्यास मनाई करीत त्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्याचे आदेश देण्यात आले. परंतु स्लिपर्स घालून आलेल्या काही परीक्षार्थ्यांना मात्र परवानगी देण्यात आली. तसेन मुलींनी सोबत असलेल्या हेअर पिन्स, हेअर बॅण्डसह इतर वस्तू देखील प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्यास बजावण्यात आले. चप्पला काढून ठेवल्याने परीक्षार्थ्यांनी अनवाणी परीक्षा दिल्या. परीक्षा संपल्यानंतर उन्हाचा चटका सहन न झाल्याने ते पळत सुटले व सावलीच्या आडोशाखाली आपापल्या चप्पला घातल्या. शाळेच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे पालकांनी संताप व्यक्त करीत सीबीएसईच्या निर्देशानुसार केवळ बुटांना परवानगी नसताना सर्वच मुलांच्या चप्पलांना परवानगी का नाकारण्यात आली, अशी विचारणा केली. याबाबत शाळेतील सुरक्षारक्षकांना विचारले असता त्यांनी सीबीएसईच्या निर्देशाकडे बोट दाखवून अधिक सांगण्यास नकार दिला.