शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांत शाळांचा ‘मेक ओव्हर’

By admin | Updated: January 12, 2015 01:07 IST

गेल्या नऊ वर्षांत राज्यात शाळांमधील पायाभूत सोयींचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. राज्यांतील ९७ टक्के शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी वेगळे स्वच्छतागृह असून अर्ध्याहून अधिक शाळांमध्ये

महिला स्वच्छतागृहाचे प्रमाण ४७ वरून ९७ टक्क्यांवरयोगेश पांडे - नागपूरगेल्या नऊ वर्षांत राज्यात शाळांमधील पायाभूत सोयींचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. राज्यांतील ९७ टक्के शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी वेगळे स्वच्छतागृह असून अर्ध्याहून अधिक शाळांमध्ये संगणक उपलब्ध आहे. डीआयएसई’तर्फे (डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. विशेषत: देशपातळीवर ‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) कायदा लागू झाल्यापासून शाळांमध्ये नियमांची अंमलबजावणी करण्याकडे भर दिसून येत आहे.केंद्र शासनाच्या ‘एनयूईपीए’कडून (नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅन्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) देशपातळीवरील निरनिराळ््या शाळांकडून विविध बाबींसंदर्भात माहिती गोळा करण्यात आली. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमधील ९६ हजार १७९ शाळांचा यात समावेश होता. ‘डीआयएसई’तर्फे २००५-०६ ते २०१३-१४ या कालावधीतील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार २००५-०६ मध्ये राज्यातील ४७.५ टक्के शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह होते. ९ वर्षांत हेच प्रमाण दुपटीहून वाढले असून २०१३-१४ मध्ये ही संख्या ९७.६ टक्क्यांवर गेली आहे. देशपातळीवर हीच टक्केवारी ८४.६ टक्के इतकी आहे. शिवाय राज्यातील ९९.३ टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. नऊ वर्षांपूर्वी हीच टक्केवारी ८२.६ टक्के इतकी होती. शाळा होताहेत ‘हायटेक’जगभरात ‘ई-लर्निंग’चे प्रमाण वाढीस लागलेले असताना राज्यातील शाळांमध्येदेखील संगणक साक्षरतेवर भर देण्यात येत आहे. २००५-०६ मध्ये राज्यातील केवळ २३.१ टक्के शाळांमध्ये संगणक उपलब्ध होते. परंतु नऊ वर्षांत हे प्रमाण दुपटीने वाढून ५०.६ टक्के झाले आहे. देशामध्ये हेच प्रमाण अवघे २३.३ टक्के इतकेच आहे.विशेष म्हणजे १४ टक्के उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणकाच्या साहाय्याने शिक्षण देणाऱ्या ‘लर्निंग लॅब’ची उभारणी करण्यात आली आहे.