शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने जागवल्या शालेय आठवणी

By admin | Updated: August 22, 2016 02:58 IST

महाविद्यालयात कितीही मोकळीक मिळाली असली तरी शाळेतील शिस्त आजही तेवढीच हवीहवीशी वाटत असते.

मुंबई : महाविद्यालयात कितीही मोकळीक मिळाली असली तरी शाळेतील शिस्त आजही तेवढीच हवीहवीशी वाटत असते. त्यामुळे शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथील उत्कर्ष बाल मंदिर शाळेत नुकतेच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन पार पडले. व्हॉट्सअ‍ॅपमुळे हे सर्व विद्यार्थी एकत्र आले. या स्नेहसंमेलनात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या ओठांवर काही क्षणांसाठी का होईना, फिरसे मुझे स्कूल में जाने दो ना जरा... या गाण्यांच्या ओळी आल्या.बाल उत्कर्ष मंदिर शाळेत १९९१-९२मध्ये दहावीच्या वर्गात शिकणारे ६० विद्यार्थी तब्बल दोन तपांनी म्हणजेच २४ वर्षांनी पुन्हा आपल्या शाळेत एकत्र आले. केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या साध्या संदेशातून हे विद्यार्थी एकत्र आले. या बॅचच्या चार-पाच विद्यार्थ्यांची अवचित भेट झाली आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांनी ग्रुप तयार केला. सकाळी ११ वाजता शाळेची घंटा वाजली व तासिका सुरू झाली. हे सर्व माजी विद्यार्थी जुन्याच वर्गात बसले होते. शाळेचे संचालक नार्वेकर सरांनी सरस्वती पूजन केले. गंमत म्हणजे त्या वेळी वर्गात असलेली मस्तीखोर मुले आताही तेव्हाप्रमाणेच मागच्या बाकांवर शांतपणे स्मितहास्य करत बसली होती. वंदे मातरम्ने सुरू झालेली ही अनोखी शाळा गप्पा, आठवणींना उजाळा देत ‘जन गण मन’ म्हणून सुटली. पण इतक्या वर्षांनी भेटलेले सगळे विद्यार्थी ओलावलेल्या पापण्यांनी निरोप घेताना दिसून आले. (प्रतिनिधी) >१९९१-९२ मध्ये दहावीच्या वर्गात शिकणारे ६० विद्यार्थी तब्बल दोन तपांनी म्हणजेच २४ वर्षांनी पुन्हा शाळेत एकत्र आले. व्हॉट्सअ‍ॅपच्या साध्या संदेशातून हे विद्यार्थी एकत्र आले. या बॅचच्या चार-पाच विद्यार्थ्यांची अवचित भेट झाली आणि त्यांनी ग्रुप तयार केला.