शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

पथकप्रमुख आयुक्तांच्या शाळेत

By admin | Updated: August 22, 2016 03:59 IST

महासभेत फेरीवाला अतिक्रमणाच्या मुद्यावरून आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तोंडसुख घेतले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शनिवारी झालेल्या महासभेत फेरीवाला अतिक्रमणाच्या मुद्यावरून आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तोंडसुख घेतले. रविवारी सुटीच्या दिवशी आयुक्तांनी बैठका घेत प्रभाग अधिकाऱ्यांसह फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांचा चांगलाच समाचार घेतला. फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याप्रकरणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा तसेच पथकप्रमुखाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यावर सोपवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. लोकमतने ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’च्या माध्यमातून हप्तेखोरीत फेरीवाल्यांना कसे अभय मिळते, याचा गौप्यस्फोट केला होता. यावर, शनिवारच्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे यांच्यासह भाजपाचे शैलेश धात्रक यांनी सभा तहकुबी मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेच्या वेळी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी फेरीवाला-अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची टीका केली होती. अधिकारी, कर्मचारी यांची हप्तेखोरी कशी चालते, याची माहिती ‘लोकमत’कडे आहे. परंतु, याबाबत प्रशासनाला काहीच माहिती नसणे, हे आश्चर्यकारक असल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. शनिवारची महासभा एक प्रकारे ‘लोकमत’ने गाजवली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या टीकेची गांभीर्याने दखल घेत आयुक्त रवींद्रन यांनी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची मदत घेऊ. याचबरोबर फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. जे लोकप्रतिनिधी कारवाईत अडथळा आणतील, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी आयुक्तांनी महापालिका मुख्यालयात बोलवलेल्या बैठकीला सर्व प्रभाग अधिकारी, पथकप्रमुख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संजय घरत, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील, सुनील लहाने, सुरेश पवार उपस्थित होते. आयुक्तांनी फेरीवाला पथकप्रमुखांचा समाचार घेताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यादेखील जाणून घेतल्या. या वेळी कर्मचाऱ्यांची कमतरता, नादुरुस्त अवस्थेतील वाहने, वयोमान झालेल्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. या समस्यांवर ठोस कार्यवाही करण्याच्या सूचना करताना पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आणि पथकप्रमुखांची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांच्या हाती सोपवण्याचे आदेश त्यांनी उपायुक्त पाटील यांना दिले. (प्रतिनिधी)>कामचुकारांना आरोग्य विभागात टाकाजे कर्मचारी कामचुकारपणा करतात, त्यांची रवानगी सफाई कामगार म्हणून आरोग्य विभागात करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी कारवाईला अडथळा आणत असतील, तर त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनादेखील या वेळी प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.