शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या गुणवंत पाल्यांना स्कॉलरशिप

By admin | Updated: September 24, 2016 01:44 IST

राज्यातील दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे.

जमीर काझी,

मुंबई- राज्यातील दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. गुणवत्ता असूनही केवळ शुल्क भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या त्यांच्या पाल्यांना आता शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दोन टप्प्यांत बिनव्याजी एक लाख रुपये शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पोलिसांची मुले आर्थिक कारणास्तव उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी त्यांना प्रोत्साहनपर ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांतर्गत पोलीस कल्याण निधीतून (वेल्फेअर फंड) ही रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी वेल्फेअर फंडात निधीची स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांची बहुतांश मुले योग्य मार्गदर्शन व आर्थिक कारणास्तव गुणवत्ता असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिष्यवृत्ती व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेंतर्गंत पोलीस कॉन्स्टेबल ते निरीक्षक दर्जापर्यंतचे अधिकारी तसेच वेल्फेअर फंडाचे सदस्य असलेले क्लार्क व अधिकाऱ्यांच्या गुणवत्ताप्राप्त गरजू पाल्यांना मदत दिली जाणार आहे. यामध्ये भारतीय अभियांत्रिकी संस्था, देशातील कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय प्रबंध संस्था, राष्ट्रीय विधि शाळा, राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था व दंत महाविद्यालयात प्रवेश पात्रता चाचणीद्वारे (निट/जीईटी/सीईटी) प्रवेश मिळविलेल्या पाल्याला २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. त्याशिवाय शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ५० हजार रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाईल. ते मिळाल्यानंतर पोलिसांनी १२ मासिक हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करावयाची आहे. पाल्याला जर त्या शैक्षणिक सत्रात ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यास व त्यांना आवश्यकता असल्यास पूर्वीच्या अटीवर आणखी ५० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.पोलीस महासंचालक माथुर यांनी ही योजना तत्काळ लागू करण्याची सूचना राज्यातील सर्व आयुक्तालयातील आयुक्त/ अधीक्षकांना केलेली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक घटकामधील अधिकारी /अंमलदारांनी आपल्या अधीक्षक कार्यालयात प्रस्ताव द्यावयाचा आहे. या योजनेत पोलिसांशिवाय त्यांच्या कार्यालयीन वर्गाचाही समावेश असणार असून, १ नोव्हेंबरपर्यंत या योजनेबाबतचा अहवाल प्रत्येक पोलीस घटकांनी मुख्यालयात पाठवावयाचा आहे. >उपरोक्त शिक्षणसंस्थांसह बी.टेक/ बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस., अन्य व्यावसायिक शिक्षण महाविद्यालय आदी ठिकाणी अ‍ॅडमिशन घेणाऱ्या पोलीस पाल्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश घेतलेल्या पोलिसांच्या पाल्यांना ही मदत दिली जाईल. डोनेशन भरून अ‍ॅडमिशन घेतलेल्यांचा त्यासाठी विचार केला जाणार नाही.>पोलीस अंमलदार/ अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना उच्च शिक्षण घेऊन सक्षम बनता यावे यासाठी पोलीस वेल्फेअर फंडातून गरजू व पात्र विद्यार्थ्यांना ही रक्कम दिली जाईल. ज्या घटकांत निधीची कमतरता आहे, त्या घटकप्रमुखांनी पोलीस मुख्यालयात त्याबाबतचे प्रस्ताव पाठवावयाचे आहेत.- प्रज्ञा सरवदे, अपर महासंचालक, प्रशासन