शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा ओसरला; उकाडा कायम

By admin | Updated: April 4, 2017 05:39 IST

गुजरातमध्ये निर्माण झालेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम म्हणून मागील आठवड्यात राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली

मुंबई : गुजरातमध्ये निर्माण झालेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम म्हणून मागील आठवड्यात राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली होती. राज्यातल्या प्रमुख शहरांचे कमाल तापमान ४० ते ४२ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत होते. तर मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंदवण्यात येत होते. परिणामी, मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. मात्र, आता वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईचे कमाल तापमान ३८ हून ३४ आणि ३४ हून ३२ अंशांवर घसरल्याने उन्हाचा तडाखा कमी झाला, परंतु उकाडा कायम आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंद झाले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण मराठवाड्यात, कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मागील आठवड्यात मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंद झाले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान ३४ अंशांवर घसरले. परिणामी उन्हाचा तडाखा कमी तर उकाड्यात वाढ झाली. सद्य:स्थितीत मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशांच्या आसपास आहे. उन्हाचा तडाखा काही अंशी कमी झाला असून, उकाडा कायम आहे. मंगळवारसह बुधवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २२ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. (प्रतिनिधी)