शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘टॅमी फ्लू’चा तुटवडा

By admin | Updated: September 3, 2014 01:35 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात एक पॉझिटिव्ह व एक संशयित रुग्ण भरती आहे. परंतु या आजारावर प्रभावी औषध असलेले ‘टॅमी फ्लू’चे सिरप व गोळ्यांचा साठा

मेडिकल : ‘स्वाईन फ्लू’रुग्ण अडचणीत नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात एक पॉझिटिव्ह व एक संशयित रुग्ण भरती आहे. परंतु या आजारावर प्रभावी औषध असलेले ‘टॅमी फ्लू’चे सिरप व गोळ्यांचा साठा संपल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. औषधांविना रुग्णांवर उपचार कसा करायचा, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘टॅमी फ्लू’ औषधाचे वितरण होते. परंतु मागे पाठविण्यात आलेल्या या औषधाच्या साठ्याची मुदत ३१ आॅगस्ट रोजीच संपली. नवीन साठ्याचा प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात आला आहे, परंतु अद्यापही साठा मिळाला नसल्याची माहिती आहे. यामुळे महापालिकेच्या रुग्णालयासोबतच शासकीय रुग्णालये अडचणीत आली आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये १ सप्टेंबरला दोन संशयित रुग्णांना भरती करण्यात आले. दोघांचेही नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यापैकी उमरेड मार्गावरील विहीरगाव येथील एका ३५ वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज मंगळवारी एका ५२ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले. सौंसर, छिंदवाडा निवासी या महिलेला कुटुंबीयांनी सक्करदरा येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले होते. पण त्यानंतर मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेला अतिदक्षता विभागात ठेवले आहे. महिलेची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. तीन-चार दिवसांत दोन रुग्ण आढळून आल्याने मेडिकल प्रशासन सतर्क झाले आहे. महिलेचे नमुने तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. संशयित रुग्ण वाढत असताना मेडिकलमधील ‘टॅमी फ्लू’ गोळ्यांचा साठा नाही. रुग्णांना हे औषध बाहेरून विकत घ्यावे लागत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)