शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळय़ाविना हाऊसफुल्ल!

By admin | Updated: July 1, 2014 01:20 IST

ऑगस्ट महिन्यात गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या चाकरमान्यांना रेल्वे गाडय़ांना पहिल्याच दिवशी वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागले.

मुंबई : ऑगस्ट महिन्यात गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या चाकरमान्यांना रेल्वे गाडय़ांना पहिल्याच दिवशी वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागले. यावरून वादंग होताच मध्य रेल्वेने गणोशोत्सवात कोकणात जाणा:या चाकरमान्यांकडून मागणीच जास्त असल्याने वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत कुठलाही घोटाळा त्यामध्ये नसल्याचा दावा केला आहे. 
मात्र हा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला असला तरी त्यांनीच सादर केलेल्या एका खुलाशामध्ये कोकण रेल्वे अवघ्या एका मिनिटात हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून आले आहे. 
28 ऑगस्टला गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी रेल्वेची तिकीट आरक्षण सेवा 29 जून रोजी सुरू करण्यात आली. हे आरक्षण सकाळी 8 वाजता सुरू होताच अनेक प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांतच 300पेक्षा जास्त वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागले. याबाबत प्रत्यक्षात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लक्ष घालत रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. यात ऑनलाइन बुकिंगमध्येच घोटाळा होत असल्याचा आरोपही करीत याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकरणावरून बराच वादंग झाल्यानंतर मध्य रेल्वेने आपली भूमिका मांडत ऑनलाइन बुकिंगमध्ये घोटाळा नसल्याचा दावा केला. 
तसेच नियमानुसार तिकिटांचे आरक्षण होत असून गणोशोत्सव काळात 
मोठय़ा प्रमाणात कोकणात जाणा:या रेल्वेला मागणी असल्यानेच वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. नियमानुसार तिकीट आरक्षण होत असल्याचा दावा करतानाच या वेळी मध्य रेल्वेने 28 ऑगस्टच्या कोकणकन्या एक्सप्रेसच्या 29 जून रोजी करण्यात आलेल्या आरक्षणाची माहिती दिली. मात्र ही माहिती समोर आणताच या ट्रेनचे अवघ्या एका मिनिटाच्या आतच बुकिंग फुल्ल झाल्याचे समोर आले आहे. फस्र्ट एसी, एसी टू टायर, एसी थ्री टायर आणि स्लीपर क्लास डब्यांचे आरक्षण एका मिनिटाच्या आत फुल्ल कसे काय होऊ शकते, असे विचारल्यास थातुरमातुर कारणो मध्य रेल्वेने दिली. मात्र यावर तोडगा कसा निघू शकतो हे स्पष्ट केले नाही. त्यामुळेच कोकणच्या प्रवाशांना वेटिंग लिस्टला एका मिनिटातच सामोरे जावे लागले. भाजपा नेत्यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे तक्रार केली. गौडा यांनीही या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य (वाहतूक) अमिताभ लाल हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. (प्रतिनिधी)
 
फस्र्ट एसी : आरक्षण 8.01 वाजता आरआरसीटीसीमार्फत फुल.
एसी टू टायर : आरक्षण 8 वाजता फुल्ल. एलटीटी, नवसारी, भिलाड, तिरुपती, कुडाळ, भायखळा येथून आरक्षण झाले. 
एसी थ्री टायर : आरक्षण 8 वाजता फुल्ल. आरक्षण वापी, नागर, आयआरसीटीसी, सीएसटी, मुंबई सेंट्रल, ससाराम, भाईंदर, औरंगाबाद, भायखळा, दाहोद, माहीम, तळेगाव, बोरीवली, नाशिक येथून झाले. आरएसी आरक्षण आठ वाजता फुल्ल
स्लीपर क्लास :आरक्षण 8.01 वाजता फुल्ल. आरक्षण नाशिक, आयआरसीटीसी, सीएसटी, बोईसर, मुंबई सेंट्रल, नेव्हीनगर, मालाड, कांदिवली, लोणावळा, देवळाली, भाईंदर येथून फुल्ल.