शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेत साडेतीन लाखांचा घोटाळा

By admin | Updated: May 8, 2014 12:32 IST

तांदुळवाडीतील प्रकार : आठ दिवसात पैसे न भरल्यास फौजदारी कारवाई

सांगली : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत तीन लाख ५० हजार ५८३ रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष आणि तांत्रिक सेवा पुरवठादारांनी आठ दिवसांत घोटाळ्यातील रक्कम जिल्हा परिषदेकडे न भरल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणून घोटाळ्यातील रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिला आहे. तांदुळवाडीसाठी २००८ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६२ लाखांची पाणी योजना मंजूर झाली होती. योजनेच्या कामात सुरुवातीपासूनच गोलमाल झाल्यामुळे नागरिकांतून तक्रारी होत्या. तांदूळवाडी पाणी योजनेतील घोटाळ्याप्रकरणी तेथील भानुदास मोटे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लोखंडे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकार्‍यांनी तांत्रिक तपासणी करून तक्रारदार आणि पाणी योजनेचे काम करणार्‍या चौघांचीही दोनवेळा चौकशी झाली आहे. या चौकशीनंतरच तांदुळवाडी पाणी योजनेतील पंपिंग यंत्रसामग्री, दाबनलिका, वितरण व्यवस्था आणि महावितरणच्या वीज जोडणीच्या कामामध्ये तीन लाख ५० हजार ५८३ रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. तांदुळवाडीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष कृष्णात पांडुरंग पाटील, सचिव अस्मिता विश्वास पाटील, सामाजिक लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कांबळे, तांत्रिक सेवा पुरवठादार श्रीकांत पाटील हे सर्वजण तीन लाख ५० हजार ५८३ रुपयांच्या घोटाळ्यास जबाबदार आहेत. यामुळे संबंधित चौघांवर प्रत्येकी ८७ हजार ६४६ रुपये वसूलपात्र रक्कम आहे. संबंधितांनी घोटाळ्यातील रक्कम आठ दिवसात पाणीपुरवठा विभागाकडे भरली नाही, तर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस चौकशी झाल्यानंतर दोषींच्या मालमत्तेवर टाच आणून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा लोखंडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)