शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

एससी आरक्षणास फटका?

By admin | Updated: August 2, 2016 01:58 IST

अनुसूचित जातीच्या आरक्षणनुसार ग्रामपंचायतीच्या वॉर्डमध्ये आरक्षण असतानाही २०११च्या जनगणनेनुसार अनेक गावांत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य ते पन्नासपर्यंत गणली आहे.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात २००१च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणनुसार ग्रामपंचायतीच्या वॉर्डमध्ये आरक्षण असतानाही २०११च्या जनगणनेनुसार अनेक गावांत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य ते पन्नासपर्यंत गणली आहे. त्यामुळे या संवर्गातील नागरिकांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. निवडणुकीसाठी प्रभाग, गट, गण आदीमध्ये आरक्षण निघणे अशक्य होणार आहे. त्यामुळे जनगणना यादीत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येबाबत योग्य ती सुधारणा करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्याकडे निवेदनात केली आहे.२००१च्या जनगणनेनुसार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या आरक्षणाने निवडून आलेले सदस्य आहेत. मात्र, सदर गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य ते पन्नास अशी गणना केली आहे. २००१च्या जनगणनेनुसार तालुक्यातील ग्रामपंचायतीत अनुसूचित जातींच्या सदस्यांना आरक्षण दिले आहे. पण सन २०११ च्या जनगणना यादीत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत वास्तवाशी मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. बौद्ध व नवबौद्ध लोकसंख्येची जनगणना अनुसूचित जातीत न करता सर्वसाधारण लोकसंख्येत गणली गेल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार बौद्ध व नवबौद्ध यांचा अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत समावेश करून घ्यावा. २०११च्या जनगणनेनुसार आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभागरचनेत अनुसूचित जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण निघणे अशक्य झाले आहे. २०११ च्या जनगणना यादीमुळे अनुसूचित जातींवर अन्याय झाला आहे. योजनाच्या अनुदानापासून सदर समाज वंचित राहणार आहे. मिळणारे अनुदान कमी प्रमाणात आल्याने दलित वस्त्या विकासापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे २०११च्या जनगणनेतील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येतील तफावत त्वरित दुरुस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)>सुधारणा करणार : तहसीलदारांचे आश्वासनतहसीलदार पाटील व गटविकास अधिकारी काळे यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाध्यक्ष रमेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत ओव्हाळ, दत्ता यादव, रमेश ओव्हाळ, दिनेश शिंदे, विजय कांबळे, महेंद्र ओव्हाळ यांनी निवेदन दिले. त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तहसीलदार शरद पाटील म्हणाले, सन २०११ ची जनगणना यादी पूर्वी तयार झाली असून, त्यात तफावत असल्यास स्थानिक कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागवून, सर्व्हे करून अनुसूचित जाती लोकसंख्या सुधारणा केली जाईल.तालुक्यात १०४ ग्रामपंचायतींत १८४ महसुली गावे, तळेगाव दाभाडे व लोणावळा नगर परिषदांचा समावेश आहे. लोकसंख्या एकूण ३,७७,५५९ असून, ग्रामीण २,१९,७८४, तर शहरी १,५७,७७५ अशी आहे. तालुक्यात अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या ३६,३२५ आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या १९,७८२ आहे. त्यात पुरुष १०,१४८ महिला ९,६३४ आहेत. शहरी भागातील अनुसूचित जातीची लोकसंख्या १६,५४३ असून, त्यात पुरुष ८,३५१, महिला ८,१९२ आहे.