शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बोला, विदर्भ कधी देता?....वेगळ्या विदर्भासाठी 'एसएमएस'चा पाऊस

By admin | Updated: July 31, 2016 20:24 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आतापर्यंत रस्त्यांवर लढण्यात येणारे आंदोलन थेट नेत्यांपर्यंतच पोहोचले. विदर्भातील हजारो नागरिकांनी रविवारी मोबाईल हँग आंदोलना

वेगळ्या विदर्भासाठी 'एसएमएस'चा पाऊस : 'मोबाईल हँग' आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद ऑनलाइन लोकमतनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आतापर्यंत रस्त्यांवर लढण्यात येणारे आंदोलन थेट नेत्यांपर्यंतच पोहोचले. विदर्भातील हजारो नागरिकांनी रविवारी मोबाईल हँग आंदोलनाअंतर्गत मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना थेट मोबाईलवरच संपर्क केला. विदर्भातील ११ जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी वेगळ्या विदर्भाची पूर्तता कधी होणार या आशयाचे 'एसएमएस' जनप्रतिनिधींना पाठविले.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता रस्त्यासोबतच इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे १ लाखांहून अधिक ई-मेल देशभरातील नेत्यांना पाठविण्यात आले. आता त्याहून पुढे जात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे रविवारी मोबाईल हँग आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत भाजपाचे नेते व जनप्रतिनिधींना एसएमएस पाठविण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीबाबत आश्वासने दिली होती. परंतु सत्ता स्थापनेनंतर सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडला आहे. भाजपाच्या मंत्री, आमदारांना या एसएमएसच्या माध्यमातून जाब विचारण्यात आले. आम्हाला वेगळा विदर्भ कधी देता असा प्रत्येकाचा एकच प्रश्न होता, असे समितीतर्फे सांगण्यात आले.