शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनाने भूतबाधा दूर होते!

By admin | Updated: July 7, 2014 00:56 IST

डॉक्टरांचा फंडा; नागरिकांची दिशाभूल

अकोला : देवापेक्षा विज्ञानावर विश्‍वास ठेवणार्‍या खुद्द डॉक्टरांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान बालक ांना आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन दिल्यास भूतबाधा दूर होत असल्याचा प्रसार केला जात आहे. शहरातील एका डॉक्टरचा हा फंडा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान असून, या बाबीची गंभीर दखल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांनी घेतली आहे.पुष्प नक्षत्राच्या मुहूर्तावर लहान बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरातील एका डॉक्टरने २७ जुलै ते २ मार्च २0१५ पर्यंत आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर यशस्वी होण्यासाठी सुवर्ण प्राशनाचे प्रचंड फायदे असल्याचे मनावर बिंबवल्या जात असल्याचे समोर आले. शून्य ते १२ वयोगटातील मुलांना सुवर्ण प्राशन दिल्यास त्यांची बुद्धी, बल, आयुष्य, वीर्य व वर्ण वाढत असल्याचा दावा केला आहे. यातही कहर म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांच्या अंधश्रद्धेला चालना देत सुवर्ण प्राशनामुळे लहान मुलांमधील भूतबाधा दूर होऊन पुण्याचा लाभ होत असल्याचा प्रसार केल्यामुळे संबंधित डॉक्टरांचे शिबिर वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. १0 रुपये नोंदणी शुल्क आकारून औषधी सेवनासाठी ४0 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. अवघ्या ४0 रुपयांत आयुर्वेदिक औषधीच्या सेवनामुळे भूतबाधा दूर होत असल्याच्या प्रसाराने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची सुशिक्षित डॉक्टरांकडूनच ऐशीतैशी होत आहे. या गंभीर प्रकाराची महापालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून, ही नागरिकांची शुद्ध फसवणूक असल्याचे मनपाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी स्पष्ट केले.