शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील रसिक लुटणार ‘सवाई’चा आनंद !

By admin | Updated: January 5, 2015 06:43 IST

अभिजात भारतीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य प्रसारक मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आता वेबकास्टिंगच्या माध्यमातून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पहिल्यांदाच जगभरातील रसिकांच्या दारी

पुणे : अभिजात भारतीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य प्रसारक मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आता वेबकास्टिंगच्या माध्यमातून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पहिल्यांदाच जगभरातील रसिकांच्या दारी पोहोचणार आहे.या महोत्सवातील कलावंतांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातून रसिक पुण्यात येत असतात़ त्याशिवाय हजारो रसिकांना केवळ अंतर आणि वेळ यामुळे पुण्यात येणे शक्य होत नाही़ अशा रसिकांना महोत्सवातील कलाविष्कारांचा आनंद घेता यावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात येत आहे़ मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी इंडियन मॅजिक आयचे संचालक हृषीकेश देशपांडे व राजेश देशमुख उपस्थित होते. वेबकास्टिंगची निर्मिती आणि एकूण व्यवस्थापन अमेरिकास्थित म्युझिक आॅन फायरसह इंडियन मॅजिक सांभाळत आहे.६२व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील १५ तासांचे वेब कॅप्सूल हाय डेफिनेशन प्रकारात जगभरातील संगीतप्रेमी वेबकास्टिंगद्वारे पाहू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना ५० डॉलर मोजावे लागतील. महोत्सवातील कोणताही एखादा दिवस, कलावंताच्या पूर्ण सादरीकरणाचा आस्वाद घेण्याचाही पर्याय संगीतप्रेमींसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी दहा डॉलरपासून शुल्क आहे. musiqui.com या वेबसाइटच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्येच वेबकास्टिंग केले जाईल. प्रख्यात पार्श्वगायक सोनू निगम यांचा कार्यक्रम प्रस्तुतकर्ता म्हणून सहभाग असणार आहे. उत्तर अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या ‘कलर्स’ टीव्ही चॅनेलने या वेबकास्टिंगचे सहा भागांच्या माध्यमातून प्रमोशन करण्याचे मान्य केले असल्याचे जोशी यांनी सांगितले़