शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींना एसटीची प्रतीक्षा

By admin | Updated: October 18, 2016 01:29 IST

एस.टी. बस वेळेवर येत नसल्याने सावित्रीच्या लेकींना बसस्थानकावर रात्री नऊपर्यंत अंधारातच थांबावे लागत आहे.

टाकवे बुदु्रक : आंदर मावळात तळेगाव दाभाडे-खांडी ही मुक्कामी एस.टी. बस वेळेवर येत नसल्याने सावित्रीच्या लेकींना बसस्थानकावर रात्री नऊपर्यंत अंधारातच थांबावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादा गैरप्रकार घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. आंदर मावळातील वहानगाव येथील भैरवनाथ महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळा व महाविद्यालय दुपारी साडेचारला सुटते. त्यानंतर तब्बल चार ते पाच तास बसची प्रतीक्षा करावी लागते. (वार्ताहर)>अंधारात बसची प्रतीक्षाजिल्हा परिषदेच्या माध्यमिक विद्यालयात कुसवली, बोरवली, काब्रे, डाहुली, बेंदेवाडी, मोरमारवाडी, कुसुर खांडी, निळशी या गावातील मुले-मली शिक्षणासाठी वहानगावला येतात. बसस्थानकापासून वहानगाव हे दोन किलोमीटर अंतरावर असून, बसस्थानकाजवळ गर्द झाडी आहे. येथे उशिरापर्यत थांबणे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. गावापासून दूर असलेल्या बसस्थानकाजवळ विजेचीही सोय नाही. स्थानक परिसरात वन्य प्राण्यांचाही वावर असतो. येथून एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या ८०हून अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत बसची प्रतिक्षा करीत बसावे लागते. >मिनी बसची मागणीतळेगावातून शेवटची मिनीबस दुपारी साडेचारला वहानगाववरून परत जाते. ती बस आणखी १५ ते २० मिनिटे उशिराने पुढे खांडीपर्यंत सोडण्याची पालकांची मागणी आहे.