शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई, महात्मा फुलेंना भारतरत्न द्या

By admin | Updated: July 10, 2015 03:28 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देऊन गौरवान्वित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देऊन गौरवान्वित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान समाजसुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. त्यांचे जीवन हे लोकसंघर्षाची प्रेरणाच होते. सर्वांना शिक्षणाची संधी, जातीप्रथेचे निर्मूलन, कृषी विकास, महिला व विधवांचे सबलीकरण यासाठीच्या लढ्याचे महात्मा फुले हे प्रतीक बनले होते, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. देशामध्ये स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना त्यासाठीचे मोठे श्रेय जाते. महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी महिलांमध्ये जागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचे निर्मूलन यासाठी महान कार्य केले. विधवांचे पुनर्वसन, बालकल्याण, वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी अविरत कार्य केले. पुणे आणि परिसरात प्लेगची साथ आलेली असताना त्यांनी केलेल्या सेवाकार्याला तोड नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे असामान्य कार्य विचारात घेऊन भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळण्यास ते योग्य आहेत. त्यांना ही उपाधी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे. (विशेष प्रतिनिधी)