शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’ ग्रुपच्या वर्षा सत्पाळकरांना कोठडी

By admin | Updated: February 6, 2016 03:44 IST

राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘मैत्रेय’ ग्रुपच्या मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वर्षा सत्पाळकर (४३, रा़ विरार, ठाणे) व जनार्दन परुळेक

नाशिक : राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘मैत्रेय’ ग्रुपच्या मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वर्षा सत्पाळकर (४३, रा़ विरार, ठाणे) व जनार्दन परुळेकर (रा़ पालघर) यांच्यावर सरकारवाडा पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे़ त्यापैकी सत्पाळकर यांना मुंबईहून अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ८ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान या अटकेविरोधात मैत्रेयच्या एजंटांनी जिल्हा न्यायालयात गोंधळ घातला होता़मैत्रेय गु्रपमधील गुंतवणूकदार भारत शंकरराव जाधव (संभाजी चौक, जाधववाडी ) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मैत्रेय कंपनीचे संचालक वर्षा मधुसूदन सत्पाळकर (४३, रा़ विरार, ठाणे) व जनार्दन अरविंद परुळेकर (रा़ पालघर) यांनी सप्टेंबर २०११ पासून गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे जास्त रकमेचे व परताव्याचे आमिष दाखवून ३ लाख ५९ हजार ७४० रुपयांची गुंतवणूक करून घेतली़ तसेच मुदत संपल्यानंतरही गुंतवणुकीची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम परत न करता तिचा अपहार केला़‘मैत्रेय’च्या राज्यभरात १०७ शाखा असून लाखो गुंतवणूकदारांनी विविध योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ दरम्यान, कंपनीने मुदत संपलेल्या काही गुंतवणूकदारांना धनादेश दिले असून ते न वटता परत येत आहेत़ या कारणावरून होलाराम कॉलनीतील ‘मैत्रेय’च्या कार्यालयात मंगळवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास गुंतवणूकदारांनी गोंधळ घालून फलकाची तोडफोडही केली होती़ रिअल इस्टेटमधील मंदीमुळे गुंतवणूकदारांची रक्कम देण्यास उशीर होत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते़ नाशिक पोलीसांनी गुरुवारी मुंबई येथून सत्पाळकर यांना अटक केली़ त्यांना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, सत्पाळकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ ह्यमैत्रेयह्णच्या एजंटांनी जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घालून तीव्र घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले़ तसेच काही एजंटांनी माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की व मारहाण केल्यामुळे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ (प्रतिनिधी)