शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे महापौर, सचिव अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 02:35 IST

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादात महापालिकेचे महापौर व सचिव

मुंबई : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादात महापालिकेचे महापौर व सचिव अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे ठराव मंजूर केल्याबद्दल महापौर व सचिवांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्यानंतर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या बैठकीत गोंधळ झाला. सीलबंद लिफाफ्यातील उमेदवारांच्या नावाऐवजी सभागृहातील काही नगरसेवकांनी गोंधळ घालून महापौरांच्या हातातील लिफाफे खेचून फाडले आणि त्यांच्या मर्जीनुसार काही नगरसेवकांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. या गोंधळामुळे महापौरांनी उमेदवार नियुक्तीची प्रक्रिया पार न पाडताच तेथून काढता पाय घेतला, असे सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांनी याचिकेत म्हटले आहे. कायद्यानुसार, बंद लिफाफ्यातील १६ नावांपैकी आठ नावांवर नगरसेवकांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून शिक्कामोर्तब करायला हवे. राज्य सरकारने स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीसंदर्भात ६ जुलै २०१० रोजी परिपत्रक काढले आहे. मात्र या परिपत्रकानुसार महापालिकेच्या सदस्यांची निवड न करून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.‘महापौरांनी सभागृहातून पळ काढला तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब करून ठराव मंजूर केला. पालिकेच्या मिनीट बुकमध्ये त्यांनी मागच्या तारखेने नोंद करत बनावट कागदपत्रे बनवली. त्यामुळे पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल आणि बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि महापालिका सचिवांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलिसांना द्यावा,’ अशी मागणी कोरी यांच्यातर्फे अ‍ॅड. विजय किल्लेदार यांनी उच्च न्यायालयात केली.उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. (प्रतिनिधी)