शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

सांग दर्पणा.. कसा मी दिसतो ?

By admin | Updated: November 6, 2014 22:01 IST

तरुणींना मर्यादा : मोबाईल, गाडीची काच, संगणक यातील आरसा म्हणून काहीही चालते

प्रगती जाधव-पाटील - सातारामहिला आणि दर्पणाचे खूप जवळचे आणि घट्ट नाते आहे. स्वत:चे सौंदर्य न्याहळण्यासाठी तरुणी सर्वाधिक दर्पणाचा वापर करतात, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र, तरुणींपेक्षाही अधिक वेळ दर्पण दिसेल तिथे स्वत:ला न्याहळत बसण्याचा पहिला मान तरुणांकडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.पूर्वी अंघोळीनंतर आवरताना एकदाच आरशात स्वत:चा चेहरा बघणारा तरुण आता बदलला आहे. आता सकाळी बेडमधून बाहेर पडतानाच मोबाईलचा आरसा करून तरुणांच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळचे आवरून बाहेर पडेपर्यंत घरात सर्वांचा ओरडा खाऊनही ही मुलं सुधारत नाहीत.महिला आणि दर्पण याचे नाते साहित्यातही पाहायला मिळते. यावर अनेक कविता आणि चित्रपटांतून अनेक गाणीही प्रसिद्ध आहेत. पण, आता आरशाचे नाते अधिक व्यापक होत ते तरुणांपर्यंतही पोहोचलेले आहे. आपले सौंदर्य खुलविण्यासाठी तासन्तास आरशासमोर बसलेल्या तरुणांवर भविष्यात कवी मनातील कल्पना उमगली तर नवल याचे वाटायला नको.हे आहेत तरुणांचे आरसे...!गाडीचा आरसाचारचाकीची खिडकीची काचमोबाईल स्क्रिनदुकानाचे काचेचे दारमित्राचा गॉगलमोबाईलचा फ्रंट कॅमेराबंद असलेला टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीनव्यायामशाळेतील आरसे काय करतात आरशात बघून...केस सावरणे चेहऱ्यावरील धूळ पुसणेमिशीची सेटिंग नीट करणेइन शर्ट, आउट शर्ट पॅटर्न बघणेआपला अपिअरन्स तपासणेका बघतात आरशातहेअरस्टाईल ठिकठाक असावी म्हणूनआपल्या लूकमध्ये कुठेही गबाळेपणा दिसू नये म्हणूनहेअरस्टाईल नीट कॅरी करता यावी म्हणूनरस्त्यावर कोणाची तरी वाट बघताना मिळालेल्या वेळेचा सदुपयोगस्वच्छ प्रकाशात चेहऱ्यावरील बदल दिसावेत म्हणून.व्हॉट्स अ‍ॅपवर आपल्या बॉडीची छबी इतरांना दाखविण्यासाठी काहीजण आरशाचा वापर करतात.तरुणींच्या दर्पणाला मर्यादाघरातून बाहेर पडताना आवरलेलं पुन्हा पाहायचं असेल किंवा त्यात काही नीटकेपणा करायचा असेल, तर तरुणी अजूनही बंदिस्त ठिकाणी जाणे पसंत करतात. त्यामुळे मुलींच्या दर्पणाला मर्यादा आहेत. या उलट तरुण रस्त्यावर कुठेही आरशात बघून स्वत:ला आवरू शकतात. कुठला शर्ट इन केल्यावर चांगला दिसतो आणि कुठला आऊट केल्यावर मस्त वाटतो, याची चर्चाही मुलं चौकात उभे राहून डेमो करून दाखवू शकतातपण आजही कपाळावरची टिकली नीट करायची असेल, तर आडोसा असलेल्या ठिकाणी जाऊन ती व्यवस्थित करण्याकडे तरुणींचा कल असतो.कपड्यांमध्ये मुलींना जशी खूप व्हरायटी आहे, तशीच लूक बदलण्यासाठी मुलांना चांगला वाव आहे. दाढी, मिशी, केश रचना यातील किरकोळ बदल केले तरीही त्यांचा लूक बदलतो. बदललेला लूक कायम ठेवण्यासाठी सजग राहावे लागते. म्हणूनच तरुणींच्या तुलनेत तरुण आरशासमोर अधिक वेळ खोळंबलेले दिसतात.- चंदन पवार,मेन्स् पार्लर चालकसर्वांनाच असे वाटते की, मुली सर्वाधिक वेळ आरशासमोर घालवितात. वास्तविक तरुण सर्वाधिक वेळ आरशासमोर असतात. दर पंधरा-वीस दिवसांला आपली स्टाईल बदलणारे तरुण घर, रस्ता, दुकान असे कुठेही स्वत:ला आरशात न्याहळत बसतात.- संयोगिता घाटगबऱ्याचदा आमची हेअर स्टाईल गाडीवरच्या प्रवासाने विसकटण्याची भीती असते. केलेली हेअर स्टाईल वाऱ्याने बदलली तर लूक खूप घाण दिसतो. म्हणून गाडीवरून उतरल्या-उतरल्या आम्ही आरशात बघून केस नीट करतो. तरुणी तोंडाला स्कार्फ बांधत असल्यामुळे त्यांना त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही..- सयाजी कदम, सातारा