शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वाळूतस्करांना ‘एमपीडीए’ अंतर्गतची अटक योग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 05:29 IST

वाळूतस्करी करणारी व्यक्ती जनजीवन विस्कळीत करू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटिज् अ‍ॅक्ट (एमपीडीए) अंतर्गत केलेली अटक योग्यच

मुंबई : वाळूतस्करी करणारी व्यक्ती जनजीवन विस्कळीत करू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटिज् अ‍ॅक्ट (एमपीडीए) अंतर्गत केलेली अटक योग्यच आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने जळगाव न्यायालयाने दिलेला आदेश योग्य ठरवला.जळगावचा नीलेश देसले याला जळगाव पोलिसांनी एपीडीए अंतर्गत अटक केली. याविरुद्ध त्याने जळगाव दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. मात्र दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांनी केलेली अटक योग्य ठरवली. त्यामुळे देसलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने जळगाव दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल योग्य ठरवत देसलेला दिलासा देण्यास नकार दिला.‘वाळूतस्करी करणारे पैशाच्या आणि ताकदीच्या आधारे संबंधित परिसरात दहशत निर्माण करतात. त्यामुळे ते जनजीवन विस्कळीत करू शकतात,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. जनजीवन विस्कळीत करणाऱ्यांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात येते. यामध्ये बेकायदा दारू गाळणारे, वाळूतस्करी करणारे व अन्य जणांचा समावेश आहे. ‘वाळू चोेरल्याप्रकरणी देसलेवर यापूर्वी चार वेळा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाळू चोरल्याने संबंधित ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागली. पर्यावरणाचे संतूलन बिघडू लागले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे या परिसरातील शेतकरी व नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. या परिसरातील लोकांना आरोपीच्या कामाबद्दल माहिती असल्याने ते भीतीच्या छायेत राहात आहेत. हे कृत्य जनजीवन विस्कळीत करण्याप्रमाणे आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. ‘नागरिकांचे हित जपण्यासाठी संसदेने एमपीडीएची व्याख्या सुधारत त्यामध्ये वाळूतस्करी करणाऱ्यांचाही समावेश केला,’ असे म्हणत खंडपीठाने देसलेला दिलासा देण्यास नकार दिला. ही याचिका देसलेच्या मित्राने उच्च न्यायालयात दाखल केली. कागदपत्रांची पडताळणी न करताच पोलिसांनी आरोपीवर एमपीडीए लावला आहे. मात्र उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)