शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १०७ कोटी मंजूर

By admin | Updated: October 16, 2016 02:13 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसवलतींकरिता राज्य शासनाने १०७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे २० हजार विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील वसतिगृहप्रवेशाचा प्रश्न सुटला

- गणेश वासनिक, अमरावती

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसवलतींकरिता राज्य शासनाने १०७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे २० हजार विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील वसतिगृहप्रवेशाचा प्रश्न सुटला आहे. भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्याच्या निर्णयावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यभरात ४९१ वसतिगृहे असून त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ५८ हजार ४९५ आहे. मात्र, यावर्षी वसतिगृह प्रवेशासाठी २० हजार विद्यार्थ्यांची वाढीव मागणी पुढे आली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी १०७ कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय झाला.अशी मिळेल विद्यार्थ्यांना रोख रक्कमआदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोईसवलती देण्यासाठी तीन प्रकारचे निकष ठरविण्यात आले आहेत. मेट्रो शहरात (पुणे, मुंबई) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह ६ हजार रुपये, विभाग स्तरावर ५ हजार १०० रुपये, तर जिल्हा व तालुका स्तरावर ४ हजार ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.उच्चशिक्षणासाठीच्या अटीआदिवासी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेताना, आता इयत्ता १२वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे रहिवासी, जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडीटी), तसेच पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र संशोधन समितीने ग्राह्य केलेले जातीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.अतिशय बिकट परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी धाडसी निर्णय घेतला आहे. विष्णू सावरा यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.- राजू तोडसाम, अध्यक्ष, आदिवासी आमदार समिती, महाराष्ट्र