शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सयामी जुळ्यांची होणार लवकरच रक्ततपासणी

By admin | Updated: July 31, 2016 01:53 IST

बाळ जन्माला आल्यावर पुढचे काही दिवस बाळाच्या शरीरात आईचेच रक्त असते.

मुंबई : बाळ जन्माला आल्यावर पुढचे काही दिवस बाळाच्या शरीरात आईचेच रक्त असते. आईचे रक्त शरीरात असल्यामुळे या काळात बाळाच्या रक्ताच्या तपासण्या केल्यास योग्य आणि अचूक असा अहवाल मिळत नाही. सायन रुग्णालयात जन्माला आलेल्या सयामी जुळ्यांच्या रक्ततपासण्या करण्यात आल्या नाहीत. काहीच दिवसांत या तपासण्या करण्यात येतील, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सयामी जुळ्या मुलांना विलग करण्याची शस्त्रक्रिया केव्हा करायची यासाठी सध्या तपासण्या सुरू आहेत. पुढील सात ते आठ दिवस या तपासण्या सुरू राहणार आहेत. या जुळ्या मुलांमध्ये एकाच मुलाच्या शरीराची वाढ झाली आहे. एका मुलाची वाढ खांद्यापासून डोक्यापर्यंत झाल्याने ही दोन्ही मुले चिकटलेली आहेत. या दोघांना विलग करण्यासाठी विविध तपासण्या करणे आवश्यक आहे. त्यानंतरच सर्व निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या पिडिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. पारस कोठारी यांनी दिली.या मुलांच्या शारीरिक अंतर्गत वाढीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी शुक्रवारी या मुलांची टू-डी इको ही तपासणी करण्यात आली. एमआरआय फायबर ट्रॅटोग्राफी करण्यात आली. या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी एथिक्स कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. मुलांची शारीरिक क्षमता वाढवल्यावर शस्त्रक्रिया केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली. (प्रतिनिधी)