शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

समीरची ब्रेन मॅपिंग, नार्को तपासणी करणार

By admin | Updated: September 25, 2015 00:34 IST

पानसरे हत्या प्रकरण : फॉरेन्सिक लॅबचा अहवाल दोन दिवसांत हाती

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची लवकरच ब्रेन मॅपिंग आणि नार्को तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याने कोल्हापूर पोलिसांना तपासात अपेक्षित सहकार्य केलेले नाही. त्याची आठ दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी (दि. २३) संपली. त्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्यात आली. गेल्या आठ दिवसांत समीरकडे तपास करताना पोलिसांच्या हाती त्याचे मोबाईलवरील संभाषण हाच ठोस मुद्दा मिळाला आहे. त्याने संकेश्वर येथे कट रचल्याबद्दलही पोलीस माहिती काढत आहेत; पण तो पोलिसांना तपासकामात अपेक्षित सहकार्य करीत नसल्याने त्याची लवकरच नार्को आणि ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यात येणार आहे; पण त्यासाठी समीरची मान्यता घेणे बंधनकारक आहे. याशिवाय गुजरात येथील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने त्याचे व्हाईस रेकॉर्डिंग, संभाषण, कॉल डिटेल्स तसेच त्याच्या वर्तणुकीबाबत तपासणी केली होती. त्याचाही अहवाल येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अहवाल आल्यानंतरच त्याच्या कॉलवरील संभाषणांचा बऱ्यापैकी उलगडा होणार आहे. दरम्यान, समीरला सांगली येथे त्याच्या निवासस्थानी छापा टाकून कोल्हापूर पोलिसांनी दि. १६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यावेळी त्या छाप्यात त्याच्या निवासस्थानी जप्त केलेल्या अनेक कागदपत्रांसह सुमारे ३१ मोबाईलच्या सीमकार्डांबाबतही तपासणी करण्यात येणार आहे. ही मोबाईलची सीमकार्ड सांगली, मुंबई, ठाणे, पनवेल, गोवा, बेळगाव (कर्नाटक) येथील काही व्यक्तींची नावेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहेत. या सर्वांना समीरच्या वाढीव पोलीस कोठडीच्या मुदतीत कोल्हापुरात बोलावून घेऊन त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्या दृष्टीने पोलिसांची तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीमध्ये संबंधित व्यक्तींची ओळख परेड घेण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात समीर गायकवाड याचीही आणखी कसून चौकशी करण्यात आली. (प्रतिनिधी)