शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेन मॅपिंग चाचणीला समीरचा नकार

By admin | Updated: October 10, 2015 01:37 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर गायकवाड याने शुक्रवारी न्यायालयासमोर ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यास नकार दिला.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर गायकवाड याने शुक्रवारी न्यायालयासमोर ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यास नकार दिला. मानसिक अवस्था ठीक नसल्याने चाचणी घेण्यास इच्छुक नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे तपास यंत्रणेचा यासंबंधीचा अर्ज नामंजूर करून २३ आॅक्टोबरपर्यंत समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केल्याचा निर्णय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी दिला. तपासकामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी सादर केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. तुझी ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास पोलीस इच्छुक आहेत,असे न्यायमूर्र्तींनी समीरला सांगितले.तेव्हा माझी मानसिक अवस्थाठीक नसल्याने मी चाचणीकरण्यास इच्छुक नसल्याचे समीरने सांगितले. याबाबत युक्तिवाद करताना गायकवाडचे वकील समीर पटवर्धन आणि अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्यात काहीवेळ शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर न्यायमूर्ती डांगे यांनी समीरला संमतीसाठी आणखी वेळ हवा का? असे विचारले असता त्याने त्याची गरज नसल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना सादर केलेला ब्रेन मॅपिंगचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे न्यायमूर्ती डांगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) उच्च न्यायालयात अपील करणारसंशयित समीर गायकवाड याने ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास नकार दिला; त्यामुळे पानसरे कुटुंबीयांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांच्याशी चर्चा करून या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे मेघा पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.न्यायमूर्ती डांगे यांनी ‘इन कॅमेरा’ सुनावणी घेऊ. त्यासाठी इतर लोकांनी व वकिलांनी बाहेर थांबावे, असे सांगितले. परंतु काही वेळ थांबून त्यांनी सर्वांसमोरच सुनावणी घेतली.