शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

समीर जोशीचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: July 6, 2016 01:42 IST

श्रीसूर्या घोटाळा प्रकरणातील आरोपी समीर जोशी तीन वर्षांपासून आहे कारागृहात.

अकोला : गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या कंपनीचा संचालक समीर जोशी याचा जामीन अर्ज मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी अकोल्यासह राज्यातील अनेक शहरांमधील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट व भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविले आहे. या प्रकरणी समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. समीर जोशी गत तीन वर्षांंंपासून नागपूर कारागृहात असून, त्याच्या पत्नीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. रामदासपेठ आणि खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ात समीर जोशीच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने समीर जोशीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. आशीष देशमुख यांनी, तर सरकार पक्षातर्फे अँड. आर. आर. देशपांडे यांनी कामकाज पाहिले. पुरवणी दोषारोपपत्र नाहीश्रीसूर्या घोटाळय़ातील आरोपी समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी वगळता अन्य आरोपींचे पुरवणी दोषारोपपत्र गत दोन वर्षांंंपासून अद्यापही न्यायालयात दाखल करण्यात आलेले नाही. श्रीसूर्या घोटाळय़ातील अन्य आरोपींचा घोटाळय़ात सक्रिय सहभाग असताना त्यांचे दोषारोपपत्र सादर करण्यास वेळ लागत आहे.४0 हजार पानांचे दोषारोपपत्रश्रीसूर्या घोटाळय़ामध्ये अमरावती आणि नागपूर पोलिसांनी तपास पूर्ण करून तब्बल ४0 हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे, तर अकोल्यातील घोटाळय़ात समीर जोशी व पल्लवी जोशी वगळता अन्य आरोपींचे पुरवणी दोषारोपपत्रही पोलिसांनी न्यायालयात सादर केले नाही. श्रीसूर्या घोटाळय़ात आरोपी असलेल्यांची अमरावती आणि नागपूर येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, तर अकोल्यातील मालमत्ता जप्तीसंदर्भात अद्यापही काहीच कारवाई झालेली नाही.फरार आरोपींना जामीनश्रीसूर्या घोटाळय़ातील आरोपी पितळे पिता-पुत्र, शंतनु कुर्‍हेकरसह अकोल्यातील अन्य आरोपी तब्बल दीड वर्ष फरार होते. या फरार आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर समीर जोशी तीन वर्षांंंपासून कारागृहात असून, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.