शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम

By admin | Updated: November 22, 2014 03:03 IST

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असाव्यात, असे मत राज्यपाल आणि कुलपती सी.विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले

मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असाव्यात, असे मत राज्यपाल आणि कुलपती सी.विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले. राज्याचा समतोल विकास साधताना आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक प्रगतीवर लक्ष दिले पाहिजे, सूचनाही त्यांनी केली.राज्यपालांनी आज राजभवन येथे वित्त व नियोजन, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि आदिवासी विकास या विभागांचा आढावा घेतला. महाराष्ट्रासमोर आज अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनंगटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते.राज्यपालांनी विद्यापीठांची स्वायतत्ता, त्याअंतर्गत येणारे कायदे, विद्यापीठामधील अभ्यासक्रम, दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता तसेच मागास भागात विद्यापीठांची उपयुक्तता वाढविणे या विषयांवर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याशिवाय सर्व विद्यापीठांमध्ये एकसमान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असण्यावर त्यांनी भर दिला. अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा प्रश्न राज्यात गंभीर असून तो राज्य शासनाने तातडीने हाताळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मुंबई विद्यापीठाला मिळाली आहे. पुढील वर्षी जानेवारीत ही परिषद मुंबईत होत आहे. त्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे, असे राज्यपाल म्हणाले. यावेळी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)