शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

हिट अँड रनप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ

By admin | Updated: November 30, 2015 19:25 IST

हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने सलमान खानची याचिका फेटाळली आहे. सन २००२ च्या हिट अँड रनप्रकरण या खटल्यातील साक्षीदार गायक कमाल खानला बोलावण्याची मागणी सलमानने केली होती.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने सलमान खानची याचिका फेटाळली आहे. सन २००२ च्या हिट अँड रनप्रकरण या खटल्यातील साक्षीदार गायक कमाल खानला बोलावण्याची मागणी सलमानने केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सलमानची ही मागणी फेटाळली आहे. सलमान खानला हिट अँड रनप्रकरणी सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे.  न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्यासमोर सध्या त्याच्या अपिलावरील सुनावणी सुरू आहे. सोमवारी सलमानचे वकील अमित देसाई यांनी अर्जाद्वारे सलमानचा मित्र व घटनेच्या वेळेस त्याच्यासोबत गाडीत उपस्थित असलेला गायक कमाल खान याला साक्षीदार करण्याची मागणी केली होती. 

नेमके प्रकरण काय आहे - २८ सप्टेंबर २००२ हिट अँड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. 

खटल्यातील महत्त्वाच्या तारखा

२८ सप्टेंबर २००२ रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी सलमानला अटक झाली व त्याची जामिनावर सुटकाही झाली.
 
 ७ आॅक्टोबर २००२ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी पुन्हा सलमानला अटक झाली व त्यानंतर त्याला जामीनही मंजूर झाला.
 
 २००३ बचाव पक्षाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. सरकारी पक्षाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय सुनावणी न्यायालयावर सोडला.
 
२००६ मध्ये वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचा खटला सुरू.
 
२०११सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यासाठी सरकारी पक्षाने विशेष न्यायालयात अर्ज केला.
 
३१ जानेवारी २०१३ - वांद्रे न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यास परवानगी दिली.
 
२८ एप्रिल २०१४ : सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू झाला.
 
> सलमानवरील आरोप
 
सदोष मनुष्यवध 
 
भरधाव गाडी चालवणे 
 
निष्काळजीपणा
 
गंभीर दुखापत करणे 
 
किरकोळ दुखापत करणे - दोन महिने