शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या ‘ब्रॅण्ड’ऐवजी बनावट दारूची विक्री

By admin | Updated: December 28, 2016 03:49 IST

नववर्षाच्या स्वागतासाठी महानगरातील अनेक हॉटेल्स आणि पब सज्ज झाले आहेत. त्यासाठी तुम्ही जंगी पार्ट्यांचे आयोजन केले असले तरी त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मद्याबाबत

- समीर कर्णुक,  मुंबई

नववर्षाच्या स्वागतासाठी महानगरातील अनेक हॉटेल्स आणि पब सज्ज झाले आहेत. त्यासाठी तुम्ही जंगी पार्ट्यांचे आयोजन केले असले तरी त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मद्याबाबत खातरजमा करून घ्या. कारण तुमचा ‘ब्रॅण्ड’ चांगला असला तरी आतील दारू बनावट असण्याची शक्यता आहे. महागड्या ‘ब्रॅण्ड’मध्ये बनावट दारू भरून त्याची विक्री केली जाण्याची शक्यता दस्तुरखुद्द राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्तविली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोघा जणांकडून विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात जप्त केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत दुकानांमधूनच दारू खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नाताळ आणि नववर्षाला तळीरामांकडून हजारो लीटर दारू रिचवली जाते. आता अवघ्या चार दिवसांवर आलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठी शहरांत अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महागड्या दारूदेखील असतात. मात्र या महागड्या दारूच्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या वाळकेश्वर आणि खार परिसरात छापा घालून शहाजी पटेल आणि चमन वाघेला यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अनेक महागड्या ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यामध्ये बनावट दारू भरून त्याची विक्री केली जाणार असल्याची कबुली आरोपींनी दिली. अशी भरली जाते बनावट दारूशहरातील मोठमोठ्या हॉटेल्समधून ही टोळी महागड्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, बॉक्ससह काही पैशांमध्ये खरेदी करते. तर काही बाटल्या भंगारवाल्यांकडून खरेदी करतात. १० हजार ते १५ हजार रुपये दारूची किंमत असलेल्या या महागड्या ‘ब्रॅण्ड’च्या बाटल्या साफ करून त्यात शंभर ते दीडशे रुपयांची दारू भरली जाते. त्यानंतर याच बॉटलला पॅक करून ती पुन्हा ग्राहकांना विकली जाते. काही वेळा विदेशातून दारू आणल्याचे सांगत ही टोळी कमी किमतीतदेखील या दारूची विक्री करते.करडी नजर :नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक नावाजलेल्या ब्रॅण्डमधून बनावट दारूची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच रात्रीच्या गस्तीमध्ये मोठी वाढ केली असल्याची माहिती पूर्व उपनगरातील भरारी पथक निरीक्षक एस.एस. भोसले यांनी दिली.