शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणमुक्त भूखंडांची विक्री

By admin | Updated: June 5, 2017 02:51 IST

कारवाईनंतर अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे

कमलाकर कांबळे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कारवाईनंतर अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात नवीन पनवेल परिसरातील अतिक्रमणमुक्त केलेल्या सहा भूखंडांची निविदा काढून विक्री करण्यात आली आहे. या भूखंडांवर पुन्हा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यादृष्टीने सिडकोने हा निर्णय घेतला आहे.सिडकोची मालकी असलेल्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची वेळोवेळी कारवाई केली जाते; परंतु कारवाईनंतर मोकळे झालेल्या भूखंडांच्या सरंक्षणाच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण उभारले जाते. मागील दोन वर्षांत सिडकोच्या संबंधित विभागाने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रासह पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आदी भागांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत; परंतु यातील बहुतांशी बांधकामे पुन्हा उभारल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, सिडकोचा अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, अभियांत्रिकी आणि योजना विभागात परस्पर समन्वय नसल्याने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांवर पुन्हा बेकायदा बांधकाम उभारले जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांची तातडीने विक्री करण्याचे निर्देश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.नवी मुंबईच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने नवी मुंबई, उरण आणि पनवेल तालुक्यांतील हजारो एकर जमीन संपादित केली आहे. या संपादित जमिनीच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत हजारो भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अद्यापि सुरू असून, शेकडो भूखंडांचे वाटप शिल्लक आहे. असे असले तरी सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करण्यात आल्या आहेत. मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण झाल्याने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप करताना सिडकोची कसरत होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी अतिक्रमणमुक्त झालेले भूखंड तातडीने विक्रीला काढण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. याअंतर्गत गेल्या महिन्याभरात नवीन पनवेल परिसरातील अतिक्रमणमुक्त केलेल्या सहा भूखंडांची निविदा काढून विक्री करण्यात आली आहे.सहा भूखंडांच्या विक्रीतून २३५ कोटींचा महसूलनवीन पनवेल परिसरातील अतिक्रमणमुक्त झालेल्या सात भूखंडांच्या विक्रीसाठी सिडकोने अलीकडेच निविदा काढल्या होत्या. त्यापैकी सहा भूखंड निवासी व वाणिज्य वापाराकरिता होते. तर एक भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी आरक्षित होता. निवासी आणि वाणिज्य प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या सहा भूखंडांना अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाला. त्याद्वारे सिडकोला २३५ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. पंचतारांकित हॉटेलसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यासाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.>अतिक्रमण विभागातील अनागोंदीअतिक्रमणाला सिडकोच्या संबंधित विभागाचा भ्रष्ट आणि अनागोंदी कारभार जबाबदार असल्याचे यापूर्वी अनेक प्रकरणांतून स्पष्ट झाले आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना बळ मिळते. तसेच या विभागाकडून केली जाणारी कारवाईसुद्धा जुजबी स्वरूपाची ठरली आहे. त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांची विक्री करण्याची जबबादारी आता अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागावरच सोपविली.