शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या बोगस तिकीटांची विक्री

By admin | Updated: July 25, 2014 00:48 IST

२.५ लाखांनी फसवणूक, खासगी तिकीट विक्री केंद्र सील

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील खासगी अतिरिक्त तिकीट विक्री केंद्रावरून होणार्‍या बनावट रेल्वे तिकीट विक्रीच्या गोरखधंद्याचा रेल्वे अधिकार्‍यांनी बुधवारी रात्री पर्दाफाश केला. या बनावट तिकीट विक्रीतून कंत्राटदाराने रेल्वेला जवळपास २.५ लाख रूपयांचा चुना लावला. तिकीट केंद्राच्या संचालकास बनावट तिकीटं विकताना अटक करण्यात आली असून, या केंद्रास सील ठोकण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट विक्रीच्या खिडक्यांवर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने २00५-0६ साली अकोला रेल्वे स्थानकाबाहेर कंत्राट पद्धतीने दोन अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. अकोल्यातील आकोटफैलमधील रहिवासी शाहबुद्दीन याने स्वत:च्या आणि नातेवाइकाच्या नावाने दोन निविदा भरून, हे कंत्राट मिळविले. २00६-0७ मध्ये रेल्वे स्थानकासमोरील एका हॉटेलच्या कॉर्नरवर सुरू करण्यात आलेल्या या जनता तिकीट बुकिंग काऊंटरमधून दररोज विकल्या जाणार्‍या तिकिटांची माहिती रेल्वेचे लेखा अधिकारी मुथा हे ठेवत. मध्यंतरी मुथा यांची बदली झाली. त्यानंतर जनता तिकीट विक्री काऊंटरवरून विकल्या जाणार्‍या तिकिटांच्या तपासणीमध्ये खंड पडला. याचाच फायदा घेत शाहबुद्दीन याने तिकीट काऊंटरला अतिरिक्त कमाई करण्याचे साधन बनविले. शाहबुद्दीनला रेल्वे प्रशासनाकडून मिळणार्‍या तिकिटांच्या रोलमधील प्रत्येक तिकिटावर नंबर टाकलेला असायचा; मात्र तिकीटांवर बनावट नंबर टाकून त्याची विक्री करणे त्याने सुरू केले. अकोला रेल्वे स्थानकावर लेखाधिकारी म्हणून अलिकडेच रुजू झालेले निळे यांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी पुराव्यासहित सर्व माहिती मुंबई येथे वाणिज्य प्रबंधकांना कळविली. त्यानंतर गत दोन दिवसांपासून शाहबुद्दीनच्या तिकीट काऊंटरवर मुंबईच्या मुख्य वाणिज्य प्रबंधकांच्या चमूने पाळत ठेवली. बुधवारी रात्री १0 वाजता त्याला बनावट तिकीट विकताना रंगेहाथ पकडून, शाहबुद्दीनला चालवावयास दिलेले तिकीट काऊंटर सील करण्यात आले. पुढील चौकशीसाठी शाहबुद्दीनला भुसावळ येथे नेण्यात आले आहे. या गोरखधंद्यातून शाहबुद्दीन याने रेल्वे प्रशासनाला जवळपास २.५ लाखांचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.