शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबाला वैद्यकीय जामीन मंजूर

By admin | Updated: July 1, 2015 01:36 IST

नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटकेत असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन. साईबाबा याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे

मुंबई : नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटकेत असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन. साईबाबा याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे आणि ते लगेच न मिळाल्यास त्याच्या आरोग्यास धोका संभवू शकतो याची खात्री पटल्याने मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी साईबाबाला ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा आणि न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर करताना साईबाबाने जामिनावर असताना पुराव्यांमध्ये ढवळाढवळ करू नये व उपचार घेणार असलेल्या ठिकाणाचा पत्ता पोलिसांना द्यावा, अशा अटी घातल्या. नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून गेल्या वर्षी अटक केला गेलेला साईबाबा सध्या नागपूर कारागृहात आहे. मात्र त्यांची प्रकृती ढासळत असून, त्याला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे, असे वृत्त एका दैनिकाने प्रसारित केले होते. सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा उपाध्याय यांनीही यासाठी न्यायालयाला पत्र लिहिले. याची दखल घेत न्यायालयाने हे प्रकरण सुमोटो याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतले होते. खंडपीठाने साईबाबाचा वैद्यकीय अहवालही मागवला. त्यात त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र सरकारी वकील संदीप शिंदे यांनी याला विरोध केला. परंतु साईबाबा आरोपी असला तरी तो आजारी आहे. वैद्यकीय उपचार मिळणे हा कैद्याचाही मूलभूत अधिकार आहे, असे न्यायालयाने नमूद केले.