शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान

By admin | Updated: June 24, 2015 01:37 IST

श्रींच्या पालखीचे ४८ वे वर्ष; पायदळ वारीत सहाशे वारकरी.

गजानन कलोरे/ शेगाव (जि. बुलडाणा) : सहाशेच्यावर वारकरी, गज, अश्‍व, टाळ मृदंग आणि हरीनामाच्या गजरात मंगळवार २३ जून रोजी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकरीता प्रस्थान झाले. पंढरपुर वारीचे हे ४८ वे वर्ष आहे. सुशोभित राजसिंहासनावर ह्यश्रीह्ण चा रजत मुखवटा ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात विराजमान झाल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तद्नंतर संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त निळकंठदादा पाटील यांनी पुजा केली. तसेच अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्‍वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, किशोरबाबू टांक, पंकज शितूत, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, अशोकराव देशमुख, अग्रवाल यांनी सुध्दा श्रींच्या चरणी श्रध्दा अर्पीत केली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। करकरावरि ठेवूनिया। नाम विठोबाचे घ्यावे। पाऊल पुढे पुढे टाकावे। पंढरीशी जावे आस्थांनो संसारा। वाट पाहे उभा विठ्ठलहरि अशा एकाहून एक सरस अमृतवाणीने यावेळी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. या प्रस्थान सोहळ्याला रमेशचंद्र गट्टाणी, शरद शिंदे, शेगोकार, गोकुलदासजी चांडक, चंदुलाल अग्रवाल, तहसिलदार गणेश पवार, सौ. पवार आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत सोहळा श्रीचे प्रगटस्थळ येथे झाला. श्रींच्या पालखी समवेत वारकर्‍यांना मधुकर घाटोळ, एम. पी. पाटील, रामुलाल सलामपुरीया यांच्याकडून फराळ व नागझरीरोड लगत अशोकराव देशमुख यांच्यावतीने चहापान देण्यात आले. संत नगरीतून निघालेल्या पालखीचे पहीले स्वागत श्रीक्षेत्र नागझरी येथे श्री गोमाजी महाराज संस्थानच्यावतीने धनंजय पाटील यांनी केले. यावेळी संस्थानतर्फे वारकर्‍यांना महाप्रसाद देण्यात आला. श्रींची पालखी दुपारचा मुक्काम आटोपून रात्रीच्या मुक्कामाला पारसकडे मार्गस्थ झाली.