शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

देशात भगवा सूर्योदय

By admin | Updated: May 16, 2014 10:22 IST

भारतीय जनता पार्टी (भाजपा) प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळण्याचे संकेत मिळू लागले आणि देशात भगवा सुर्योदय होत असल्याची चाहुल लागली.

 

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १६- सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे भवितव्य ठरवणा-या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी सकाळी देशभरात सुरुवात झाली. 
सकाळच्या पहिल्या सत्रात झालेल्या फे-यांमध्ये बहुतेक सर्व राज्यांतून भारतीय जनता पार्टी (भाजपा) प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळण्याचे संकेत मिळू लागले आणि देशात भगवा सूर्योदय होत असल्याची चाहुल लागली. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास निकालाच्या संकेतांनुसार भापजा आघाडीने लोकसभेत निम्मे बहुमत मिळवण्यासाठी आवश्यक असलेला 543 पैकी 272 जागांचा आकडा पार केला आणि प्रसारमाध्यमांतील काहींनी उत्साहाने भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना  विजयी घोषितही केले. 
गेल्या दशकभरात सत्तेवर असलेल्या काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवारांचे भवितव्य झाकोळताना दिसत होते. बागपतमधून काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंग यांना पराभूत करून भाजपाचे उमेदवार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग विजयी झाल्याचे जाहीर झाले. पूर्ण मतमोजणी होऊन जाहीर झालेला हा देशातील पहिलाच निकाल होता. त्याने एकंदर निकालांची नांदीच केली होती.