शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भगवा झंझावात

By admin | Updated: November 7, 2016 06:58 IST

मराठा समाजाला आरक्षण आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर उठलेले भगवे वादळ रविवारी अखेर मुंबईत धडकले.

चेतन ननावरे, मुंबईमराठा समाजाला आरक्षण आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर उठलेले भगवे वादळ रविवारी अखेर मुंबईत धडकले. महामोर्चाची रंगीत तालीम म्हणून रविवारी निघालेल्या बाइक रॅलीने सर्वच रेकॉर्ड तोडले. नागपूर येथील शेवटच्या मोर्चानंतर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईमध्ये महामोर्चा काढला जाईल. या बाइक रॅलीवरून या महामोर्चाच्या भगव्या वादळाची कल्पना येईल, अशी प्रतिक्रिया मुख्य संयोजक वीरेंद्र पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.सोमय्या मैदानाजवळून निघालेल्या या रॅलीत सुमारे सव्वा लाख बाइक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर पोहोचलेल्या या रॅलीचे शेवटचे टोक चेंबूरला होते. नागपूरमधील मोर्चादरम्यान सरकारने मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहनही पवार यांनी केले. ‘बाइक रॅली तो झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’, असे म्हणत पवार यांनी महामोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ महिन्याभराचा अवधी देत मराठा क्रांती मूक मोर्चा संयोजन समिती आता मुंबईतील महामोर्चाच्या तयारीला लागली आहे.राज्यातील इतर मूक मोर्चांप्रमाणेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणतीही घोषणा न देता बाइक रॅलीचे नेतृत्व महिलांनी केले. सुरुवातीला महिला, त्यानंतर महिला चालक व पुरुष सहचालक आणि शेवटी पुरुष चालक अशी या रॅलीची रचना होती. मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा उभारण्यात आली होती. त्याला बाइकवरील सहचालक वंदन करून पुढे सरकत होते. मूक मोर्चांप्रमाणेच बाइक रॅलीतही शिस्तीचे दर्शन घडले. रॅलीत वापरलेले नेटवर्क मुंबईतील महामोर्चातही वापरले जाईल, अशी माहिती रॅलीच्या संयोजक समितीमधील एका सदस्याने ‘लोकमत’ला दिली.नेत्यांची गर्दीआमदार भाई जगताप, आमदार भरत गोगावले यांच्यासह शिवसेना नेते विनोद घोसाळकर, अभिनेता सुशांत शेलार यांसह अनेक नेते व सेलिब्रिटी या मोर्चात सहभागी झाले होते. मुंबईच्या डबेवाल्यांसह लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते श्रीरंग बरगे यांसारखे अनेक संघटना आणि मंडळांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.