शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरी छोटी स्वप्ने मोठी !

By admin | Updated: July 2, 2014 01:02 IST

राज्य सरकारने जकात रद्द करीत एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यामुळे महापालिकेची तिजोरी रिकामी असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १६४५ कोटी २७ लाख ६७ हजार

१६४५ कोटींचे बजेट : ना करवाढ ना उत्पन्न वाढीचे पर्याय नागपूर : राज्य सरकारने जकात रद्द करीत एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यामुळे महापालिकेची तिजोरी रिकामी असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १६४५ कोटी २७ लाख ६७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावेळी त्यांनी तब्बल २४४ कोटींची भर घातली असली तरी, आगामी विधानसभा निवडणूक बघता जनतेवर कोणत्याही प्रकारचा नवा कर लादलेला नाही. मात्र, मनपाची रिकामी असलेली तिजोरी भरण्यासाठी विशेष काही असे उपायही सुचविलेले नाहीत. तिजोरीत पैसा नसतानाही विकासाचे स्वप्न रंगविण्यात आले आहे. बोरकर यांनी अर्थसंकल्पात १६४५.०२ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. सुरुवातीचे शिल्लक २५ लाख आहेत. ही रक्कम धरून एकूण १६४५.२७ कोटी रुपये जमा होतील. यातून १६४५.०८ कोटी रुपये वार्षिक खर्च होतील. शेवटी १८.९२ लाख रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज मांडला आहे. फुटाळ्यावर देशातील सर्वात उंच झेंडा देशाच्या हृदयस्थानी असलेल्या संत्रानगरीत दशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ व राष्ट्रध्वज लावण्याची योजना महापालिका प्रशासनाने तयार केली आहे. फुटाळा तलावावर २९० फूट उंच राष्ट्रीय स्तंभ व राष्ट्रध्वज राहील. देशभक्तीच्या भावनेने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. हा प्रकल्प युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, जागतिक स्तरावर नागपूरला एक वेगळी ओळख मिळवून देणारा आहे. १४ नवी उद्याने महापालिकेतर्फे शहरात १४ नवी उद्याने उभारली जातील. यासाठी ४.७५ कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नासुप्रने ३ मोठे व २६ लहान उद्यानांची देखभाल करण्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. या उद्यानांचाही महापालिका विकास करेल. ‘ लोकमत’ने शहरातील महापालिकेच्या उद्यानांच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘ सांगा, कसे खेळायचे’ ? ही वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या मालिकेवर नागरिकांनी समाधान व्यक्त करीत नगरसेवक व प्रशासनावरही दबाव निर्माण केला होता. शेवटी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनाही ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घ्यावी लागली.