शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआय मंडळ बरखास्त करा!

By admin | Updated: July 1, 2015 03:25 IST

माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, नवनियुक्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी मंत्रालयाकडे करणार

पुणे : माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, नवनियुक्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी मंत्रालयाकडे करणार असल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी राकेश शुक्ला याने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.‘एफटीआयआय’ (फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मंगळवारी १९वा दिवस होता. आंदोलनाची दखल अखेर केंद्र शासनाकडून घेण्यात आली असून, शुक्रवारी नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. शिष्टमंडळात सात माजी तर तीन आजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. माजी विद्यार्थ्यांमध्ये गिरीश कासारवल्ली, रसुल पोकुट्टी, परेश कामदार, बीना पॉल, फरिदा मेहता, धरम गुलाटी, प्रतीक वत्स तर हरिशंकर नचिमुथ्थु, विकास अर्स, सीमा कौर या सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सरकारच्या प्रतिसादावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून, तूर्त आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका असल्याचे विकास अर्स याने सांगितले. चौहान यांना राजकीय विचारप्रणाली आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांवर आमचा विरोध आहे. संस्थेला मार्ग दाखवणारी व्यक्ती नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडली जावी. एफटीआयसारख्या संस्थांच्या नियामक मंडळावर नियुक्ती करताना कोणते निकष लावण्यात येतात, हे मंत्रालयाला विचारणार आहोत. संबंधित निकष सदोष वाटल्यास आमच्या दृष्टीने योग्य असलेले निकष त्यांना सुचवू, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)