शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

या दिवशी रिलीज होणार सचिनचा चित्रपट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 17:40 IST

क्रिकेटच्या जगतातील देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ट्विट करुन सांगितली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - क्रिकेटच्या जगतातील देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ट्विट करुन सांगितली आहे. 
'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' असं चित्रपटाचं नाव असून त्या चित्रपटाचं प्रदर्शन 16 मे 2017 मध्ये होणार आहे, असं ट्विट सचिन तेंडुलकरनं केलं आहे. दरम्यान, या चित्रपटाचं पहिलं पोस्टर गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यावेळी सुद्धा त्यानं ट्विट करुन ही माहिती दिली होती. त्याच्या या ट्विटला अभिनेता शाहरुख खान, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी चित्रपटाबद्दल रिट्विट करत उत्सुकता दर्शवली होती. तसेच, सचिन तेंडुलकरनं 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसातचं त्याच्या जीवनावर आधारित 'प्लेईंग इट माय वे' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पहिल्यांदा सचिन तेंडुलकरनं पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यातून पदार्पण केलं. त्यानंतर क्रिकेटमध्ये त्यानं केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याची गणती जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होऊ लागली. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत.